गिरीश महाजनही भ्रष्टाचारी आणि मुख्यमंत्री खडसेंना घाबरतात : अंजली दमानियांचे आरोप

आज जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खडसे न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. तसेच महाजन आणि मुख्यमंत्र्यांवरही शरसंधान केले.
गिरीश महाजनही भ्रष्टाचारी आणि मुख्यमंत्री खडसेंना घाबरतात : अंजली दमानियांचे आरोप

जळगाव : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजनांकडे आता आपले लक्ष वळवले आहे. गिरीश महाजनही भ्रष्टाचारी असून मुख्यमंत्री एकनाथ खडसेंना घाबरतात अशी वक्तव्ये त्यांनी आज जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहेत.

आज जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खडसे न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. तसेच महाजन आणि मुख्यमंत्र्यांवरही शरसंधान केले. महाजन यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "खडसे यांनी आपण प्यादे असल्याचे म्हटले आहे. तसेच या मागे मंत्री असल्याचा आरोप केला आहे.जळगावात गिरीश महाजन हेच एकमेव मंत्री आहेत. परंतु आपण महाजन यांच्याकडून एकही कागद घेतलेला नाही. उलट मंत्री महाजन आणि सुरेश जैन यांच्या विरूध्दही आपला लढा आहे. कारण हे सर्वच भ्रष्टाचारी आहेत. मंत्री गिरीश महाजनही भ्रष्टाचारी असून त्यांनी जळगावातील एस. टी.महामंडळाच्या जमिनीचा मोठ्या गटाच्या व्यवहारात गैरव्यवहार केला आहे. यात त्यांच्या पत्नी साधना महाजन आणि अॅड. रोहिणी खडसे यांचाही प्लाॅट आहे."

फडणवीस खडसेंना घाबरतात 
भोसरी जमीन प्रकरणी खडसेंना देण्यात आलेल्या क्‍लिनचिट बाबत त्या म्हणाल्या, ''सरकारने खडसेंना घाबरून क्‍लिन चिट दिली आहे. भाजप जिल्ह्यात संपत आहे, त्यामुळे पक्ष वाचविण्यसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही क्‍लीनचिट दिली आहे." फडणवीस खडसेंना घाबरतात असा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com