anit rathod criticise dilip gandhi on chindam issue | Sarkarnama

छिंदमला मांडीवर बसवणारे दिलीप गांधी रंगबदलू : अनिल राठोड

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

श्रीपाद छिंदमचे प्रकरण अंगलट आल्यामुळे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी हात झटकले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत त्याला सक्रीय करणारे, अनेक गंभीर गुन्हे नावावर असताना त्याला मांडीवर बसवून उपमहापौरपद देणारे खासदार गांधी सरड्यासारखे रंग बदलत आहेत. 

-अनिल राठोड

नगर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमचे प्रकरण अंगलट आल्यामुळे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी हात झटकले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत त्याला सक्रीय करणारे, अनेक गंभीर गुन्हे नावावर असताना त्याला मांडीवर बसवून उपमहापौरपद देणारे खासदार गांधी सरड्यासारखे रंग बदलत आहेत. आता छिंदमचा राजीनामा आपण घेतला नसल्याची आवई उठविली आहे, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याचे काही महिन्यांपुर्वी उघड झाले. त्याच दिवशी खासदार गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून त्याची पक्षातून हकालपट्टी केल्याचे व त्याचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्याच्या राजीनाम्याची प्रतही त्यांनी माध्यमांसमोर दाखविली. त्याच्या दुसऱ्या दिवशी गांधी यांच्या कार्यालयातून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची प्रत महापौर कार्यालयात व आयुक्तांच्या कार्यालयात दाखल केली. हा घटनाक्रम असताना खासदार गांधी याविषयी आता याबाबत हात झटकले आहेत, असा आरोप राठोड यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख