नाराज अनिल यादव यांची दोन दिवसांत 'गोकुळ'वर वर्णी? 

नाराज अनिल यादव यांची दोन दिवसांत 'गोकुळ'वर वर्णी? 

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या गोकुळ दूध संघावर शिरोळ तालुक्‍यातील भाजपचे नेते अनिल यादव व जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. यादव यांच्या नियुक्‍तीचा निर्णय दोन दिवसात येण्याची शक्‍यता आहे. तर इंगवले यांनी संचालक पदाबाबत मौन पाळल्याने त्यांचा निर्णय मात्र लांबवणीवर पडण्याची शक्‍यता आहे. 

शिरोळ तालुक्‍यातील कॉंग्रेसची धुरा अनेक वर्षे अनिल यादव यांनी सांभाळली. मात्र त्यांचा विधानसभा निवडणुकीसाठी कधी विचार करण्यात आला नाही. पक्षाचे प्रामाणिक काम करुनही वरिष्ठांकडून दखल घेतली नसल्याने यादव यांनी अखेर भाजपत प्रवेश केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार कामगिरी करत आपली ताकत दाखवून दिली. अल्पावधीत तालुक्‍यात भाजपचा दबदबा निर्माण करणाऱ्या यादव यांना एखादे महामंडळ जाहीर करण्यात येईल, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र ती साफ फोल ठरली.

यादव यांची नाराजी भाजप नेत्यांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी यादव यांची गोकुळवर वर्णी लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिरोळ नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदासाठी यादव यांच्या पुतण्याला संधी देण्याचा निर्णय घेवून यादव गटाची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यादव यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीतून भाजपत आलेले ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनाही जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी डावलण्यात आले आहे. सव्वा वर्षानंतर अध्यक्ष बदलण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. मात्र अध्यक्षपदी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी सौ.शौमिका महाडिक असल्याने या पदाचा राजीनामा घेणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अध्यक्षपद बदलून महाडिकांची नाराजी ओढवून घेण्याची भाजप नेत्यांची तयारी नाही. त्यामुळे इंगवले यांनाच गोकुळमध्ये संधी देवून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com