'निर्भय' नगरकर यावेळी अनिल राठोडांच्या हाकेला धावले!

अनिल राठोड हेच किंगमेकर ठरले.
'निर्भय' नगरकर यावेळी अनिल राठोडांच्या हाकेला धावले!

नगर : महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवित आपली ताकद स्वतंत्रपणे दाखवून दिली. शिवसेनेने सर्वाधिक २४ जागा मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी नगरकरांना दिलेला निर्भयतेचा नारा पुन्हा कामी आला.

महापालिकेत शिवसेना २४, राष्ट्रवादी काँग्रेस १८, भारतीय जनता पक्ष १४, काँग्रेस ५, बहुजन समाज पक्ष ४, अपक्ष २ व समाजवादी पक्षाने १ जागा जिंकली. राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होती, तर शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढत होते. 

यापूर्वीच्या निवडणुका शिवसेना व भाजपने एकत्रित लढविल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेचा भाजपला कायम आधार असतो, असे शिवसेनेचे नेते म्हणत असत, तर शिवसेनेच्या कुबड्या आम्ही घेत नाही, असे उत्तर भाजपचे असे. या वेळी मात्र भाजप व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये एकमत अखेरपर्यंत झाले नाही. उलट एकमेकांचे राजकीय अस्तित्त्व संपविण्याचीच भाषा करीत होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, भाजपचे खासदार दिलीप गांधी व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. 

अनिल राठोड किंगमेकर
महापालिकेत शिवसेनेमध्ये अनिल राठोड हेच किंगमेकर ठरले. नगरकरांनो निर्भय व्हा, असे म्हणत त्यांनी निवडणूक जिंकली. कोणालाही कोहाही अडचण असली, की अनिल राठोड तातडीने धावून जातात, ही त्यांची खासीयत. त्यामुळे नगरकरांना भयमुक्तीचा शिवसेनेकडून मिळालेला नाराच अंगवळणी पडला. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com