anil pawar question sadabhau khot | Sarkarnama

सदाभाऊ, तुमचे फोटो माढ्याच्या जनतेने बघितलेत : पवार 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

जयसिंगपूर (कोल्हापूर) : इतकी वर्षे संघटनेत असताना तुम्हाला राजू शेट्टी यांचे रक्त दिसले नाही काय? माढ्यात मग कुणाच्या जीवावर तुम्ही मते मागितली, असा सवाल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी विचारला आहे. 

नुकतेच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एका कार्यक्रमात मारहाण झालेल्या घटनेचे फोटो दाखवून मी कधी मते मागितली नाही, अशी टीका केली होती . त्याचा उत्तर देताना अनिल पवार म्हणाले की, सदाभाऊ खोत यांना केवळ राजू शेट्टी यांच्यामुळेच मंत्रीपद मिळाले आहे. स्वाभिमानीमुळेच त्यांना खरी ओळख मिळालेली आहे. लोकसभेत विरोधक कोण आहे, याची काळजी आम्ही केलेली नाही. जोपर्यत राज्यातील कष्टकरी शेतकरी, सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत आम्हाला कुणाची भिती नाही. 

तुम्हालाही बावची फाट्यावर मारहाण झाली होती. त्याचेही फोटो दैनिकात प्रसिध्द झाले होते. त्या मारहाणीची फोटो दाखवूनच तुम्ही माढ्यात मते मागितला आहात. भाजपची तळी उचलण्याऐवजी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवला असता तर तुम्हाला जनता डोक्‍यावर घेऊन नाचली असती. बावची फाट्याच्या मारहाणीची ध्वनीफीत बनवूनच माढ्यात प्रचार केला होता, असे पवार यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख