Anil Gote Forms New Party | Sarkarnama

धुळ्यात भाजपच्या विरोधात वाजणार अनिल गोटेंची शिट्टी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

काल मुख्यमंत्र्यांनी गोटे राजिनामा देणार नाहीत, अस वक्तव्य केले होते. आपली व त्यांची चर्चा झाली असून ते व गिरीश महाजन आणि डाॅ. सुभाष भामरे एकत्रित मिळून धुळ्यात भाजपला निवडून आणतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, गोटे यांनी आज अखेरच्या क्षणी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. 'स्वाभिमानी भाजप = लोकसंग्राम' या नावावर निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

मुंबई : भाजपचे धुळ्यातील नाराज आमदार अनिल गोटेंनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता अनिल गोटे हे धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात 'स्वाभिमानी भाजप = लोकसंग्राम' पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. शिट्टी हे त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असणार आहे.

काल मुख्यमंत्र्यांनी गोटे राजिनामा देणार नाहीत, अस वक्तव्य केले होते. आपली व त्यांची चर्चा झाली असून ते व गिरीश महाजन आणि डाॅ. सुभाष भामरे एकत्रित मिळून धुळ्यात भाजपला निवडून आणतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, गोटे यांनी आज अखेरच्या क्षणी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. 'स्वाभिमानी भाजप = लोकसंग्राम' या नावावर निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

याबाबत गोटे म्हणाले, ''धुळे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देण्यात येणार नाही, असे भाजपकडून सांगण्यात आले होते. तसेच आगामी महापालिकेची निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली होईल, असेही ठरविण्यात आले होते. मात्र, यामध्ये अचानक काय बदल झाला? धुळे भाजप शहराध्यक्षांच्या यादीत 28 उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. शिवाय एका उमेदवाराने पालिकेत भ्रष्टाचार (घोळ) केला आहे. यांसारखे उमेदवार भाजपच्या यादीत होते." पक्षात दगाफटका झाल्याने मी आता नव्या पक्षाची घोषणा करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला असताना पक्षाने दगाबाजी केली, असा आरोप गोटेंनी केला. 

तसेच मुख्यमंत्र्यांनी गुंड उमेदवार देणार नाही, असे सांगितले. मात्र, प्रभारी यांच्या यादीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 28 उमेदवार होते. त्यावर आक्षेप घेतला असता जिल्हाध्यक्षांनी एका तासात फोन करून कळवतो, असे सांगून पुन्हा फोन केलाच नाही. त्यामुळे अखेर मला हा निर्णय घ्यावा लागत आहे.    

गोटेंच्या पत्नी असणार महापौरपदाच्या उमेदवार
आता मी स्वाभिमानी भाजप = लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे. या माध्यमातून सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीत पत्नी हेमा गोटे या महापौरपदाच्या उमेदवार असणार आहेत, असे सांगण्यात आले आहे. 

संबंधित लेख