anil gote and bjp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

गुंडांशी संबंध असलेल्या भाजपशी मीच संबंध ठेवणार नाही : अनिल गोटे

कैलास शिंदे
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

धुळे : चांगले रस्ते हे शहराच्या आणि देशाच्या विकासाचे मार्ग आहेत. आपल्या विरोधकांना तेच कळत नाही. आपण मात्र धुळ्यात चांगले रस्ते, चांगल्या मूलभूत सुविधा आणि नवीन संकुले उभारणार आहोत. त्याच माध्यमातून युवकांना रोजगारही उपलब्ध करणार आहोत. याशिवाय शहर भयमुक्त असणे, हेच ध्येय असणार आहे. शहराचा विकासही आपणच करू शकतो आणि गुंडांना चापही आपणच लावणार आहोत, असे लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक आमदार अनिल गोटे यांनी सांगितले. 

धुळे : चांगले रस्ते हे शहराच्या आणि देशाच्या विकासाचे मार्ग आहेत. आपल्या विरोधकांना तेच कळत नाही. आपण मात्र धुळ्यात चांगले रस्ते, चांगल्या मूलभूत सुविधा आणि नवीन संकुले उभारणार आहोत. त्याच माध्यमातून युवकांना रोजगारही उपलब्ध करणार आहोत. याशिवाय शहर भयमुक्त असणे, हेच ध्येय असणार आहे. शहराचा विकासही आपणच करू शकतो आणि गुंडांना चापही आपणच लावणार आहोत, असे लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक आमदार अनिल गोटे यांनी सांगितले. 

धुळे महापालिका निवडणुकीत आमदार अनिल गोटे यांनी आपल्याच भारतीय जनता पक्षाला विरोध करीत स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आमदार गोटे हे लोकसंग्रामच्या उमेदवारांच्या यशासाठी प्रत्येक प्रभागात सभा घेत आहेत. तसेच काही ठिकाणी घरोघरी प्रचार करीत आहेत. 
आमदार गोटे म्हणाले, की मी कोणताही गैरकारभार करीत नाही आणि होऊही देत नाही. त्यामुळे कोणालाही अंगावर घेण्यास मी संकोच करीत नाही. माझे वडील गांधीवादी होते. त्यांचाच मी मुलगा आहे. गरीब जनतेची सेवा करणे हेच आपले ध्येय असते असे त्यांनी सांगितले. 

आपण जीवनात आनंदी असतो. कोणालाही घाबरत नाही. कोणत्याही धमक्‍यांना भीक घालत नाही. भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या त्यागातून उभा राहिलेला आहे. मात्र, धुळ्यात आज त्याच भारतीय जनता पक्षाने सर्व राजकीय पक्षांच्या घरी जाऊन त्या ठिकाणच्या गुंडांना निमंत्रण दिले आहे. त्यांना आपल्या पक्षात घेतले. त्यांना उमेदवारीही दिली. या प्रकाराची आपल्याला चीड आली. त्यामुळेच आपण धुळ्यात पक्षाच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. मीच अशा पक्षाशी संबंध ठेवण्यास आता तयार नाही. ज्या पक्षात गुंड, खंडणी वसूल करणारे, पोलिसांना मारहाण करणारे, असे लोक आता आहेत. अशा पक्षाशी आपणच संबंध ठेवणार नाही, त्यामुळे आपलाच आता भारतीय जनता पक्षाशी संबंध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुळातच गुंड कसे तयार होतात, हे लक्षात घेतले पाहिजे. सट्टा, जुगार, गैरप्रकाराच्या पैशांतून युवकांना प्रतिष्ठा मिळते. त्यातूनच त्यांना "भाऊ' आणि "दादा' ही बिरुदावली लागते. पुढे त्यांनाच पालिका निवडणुकीत उमेदवारी दिली जाते. ते पुढे महापालिकेत निवडूनही येतात आणि त्यांना नगरसेवक म्हणून प्रतिष्ठाही मिळते. खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गुंड तयार होतात. त्यामुळे अशा गुंडांना महापालिका निवडणुकीत उमेदवारीच दिली नाही, तर त्यांना खऱ्या अर्थाने चाप लागेल आणि शहर गुंडगिरीमुक्त होईल. मी निवडणुकीत एक पाऊल पुढे गेलो आहे. शिवसेना माझ्याकडे आली नाही, मीच कोणतीही चर्चा न करता शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. गुंडगिरीच्या विरोधात आपण हा पाठिंबा दिलेला आहे. मी कोणाचाही मित्र होऊ शकतो. मात्र, त्यांचा अनुयायी होऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याचा आपला कोणताच प्रयत्न नाही. मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती, त्यांना पक्षात गुंड घेऊ नका, असे सांगितले होते. मात्र, तरीही त्यांनी पक्षात गुंडांना प्रवेश दिला. त्यामुळे आपण विरोधाची भूमिका घेतली, हे जाहीर आहे. 

संबंधित लेख