anil babar snubs sanjay kaka patil | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

तुम्ही मला विधानसभेला मदत नाही केली तरी चालेल : अनिल बाबरांचा संजयकाकांना चिमटा

संपत मोरे
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

पुणे : भाजपचे खासदार संजय पाटील आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर या आठवड्यात दोन वेळा एका स्टेजवर आले. खानापूर पंचायत समितीच्या आढावा बैठकीत हे दोघे शेजारी बसले होते. पाटील हे तर खासदार झाल्यानंतर साडे चार वर्षांनंतर पहिल्यांदाच पंचायत समितीत आले होते.

पाटील व बाबर यांच्यात अधुनमधुन शाब्दिक चकमकी झडत असतात. टेंभू योजनेचे पाणी हा दोघांच्या वादाचा मूळ मुद्दा आहे. पाटील हे काॅंग्रेसचे माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या गटाला बळ देण्याचे काम करत असतात. त्यामुळे बाबर यांचे पाटलांशी फारसे जमत नाही.  तरीही त्यांनी आजच्या बैठकीत एकमेकांचे कौतुक केले.

पाटील म्हणाले,"`खानापूर मतदारसंघात अत्यंत तत्परतेने काम करणारा, टेंभुच्या पाण्यासाठी झटणारा नेता म्हणून आम्ही अनिलभाऊ यांच्याकडे पाहतो. मी त्यांच्या विरोधकांच्या स्टेजवरून देखील भाऊंच्या योगदानाचा अनेकवेळा उल्लेख करत आलो आहे. राजकारणात मतभेत असावेत परंतु मनभेद नसावेत या तत्वाने आम्ही दोघेही काम करीत आलो आहोत.

यावेळी बाबर यांनी ,"लोकसभेला शिवसेना भाजपची युती नाही झाली तरी आपण स्थानिक विषय बसून ठरवू. मी तुम्हाला लोकसभेला मदत केल्यावर तुम्ही मला विधानसभेला मदत नाही केली तरी चालेल."असा चिमटा काढला. बाबर यांनी काढलेल्या चिमट्यावर संजयकाका पुढे काय प्रतिक्रिया देतात, याची आता उत्सुकता असेल. 

संबंधित लेख