aniket patil in bjp | Sarkarnama

अनिकेत पाटील भाजपच्या वाटेवर 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

जळगाव : कॉंग्रेसचे कट्टर समर्थक व माजी केंद्रीय दळवळण मंत्री विजय नवल पाटील यांचे पुत्र अनिकेत पाटील हे भाजपच्या वाटेवर असून आज त्यांचा मुंबईत भाजप प्रवेश सोहळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. 

नाशिक शिक्षक मतदार संघातून भाजपतर्फे अनिकेत पाटील उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठीच त्यांनी भाजपत प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे ते पुत्र आहेत. विजय पाटील दोन वेळा जळगाव जिल्हयातील एरंडोल मतदार संघातून कॉंग्रेसतर्फे लोकसभेवर निवडून गेले आहेत. 

ते मूळ धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कॉंग्रेसचे कट्टर समर्थक असलेल्या विजय पाटील यांच्या पुत्राने भाजपची वाट धरल्यामुळे खानदेशातील राजकारणात खळबळ उडणार आहे 

संबंधित लेख