संतप्त शिक्षक मतदारांकडून  धुळे, नंदुरबारला पैठणीची होळी 

पैठणीच्या होळीनंतर शिक्षक मतदार मतदानाच्या दिवशी नेमकी काय भूमिका बजावतात? प्रलोभने दाखविणाऱ्यांना जागा दाखवितात कि त्यांच्याच पाठीशी उभे राहातात हे निकालावेळी दिसून येईलच.
paithani-holi
paithani-holi

धुळे  : विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राजकीय पक्षांनी 'हायजॅक' केल्याने गाजते आहे. त्यामुळे शिक्षक मतदारांना विविध प्रलोभने दाखविली जात आहेत.

नाशिक जिल्ह्यातील एका धनवान उमेदवाराने शिक्षक मतदारांवर पैठणीसह साड्यांचा वर्षाव सुरू केला खरा. मात्र, यातून स्वाभिमान, आत्मसन्मान दुखावतो असल्याची जाणीव काही शिक्षक मतदारांना झाली आणि त्यांनी संतापात धुळ्यातील जिल्हा क्रीडा संकुलाजवळ पैठणीचीच होळी केली. 

तळवे (ता. तळोदा, जि. नंदुरबार) येथील माध्यमिक विद्यालयात पोहोचलेल्या साड्यांचीही बुधवारी दुपारनंतर होळी करण्यात आली. अशा घडामोडींमुळे या निवडणुकीचे वातावरण तापले आहे. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात आहेत.

आमदार व्हायचेच असा संकल्प केलेल्या काही आर्थिक सक्षम उमेदवारांकडून शिक्षक मतदारांना निरनिराळी प्रलोभने दिली जात आहेत. त्यातून पैठणी, इतर प्रकारची साडी मतदारांच्या घरपोच पाठविण्याचा उपक्रम राबविला जात आहे. पाकिटातून पाचशेच्या सहा नोटांचे पाकीट पोच होऊ लागले आहेत. मतदारांना आकृष्ट करण्यासाठी शिक्षक मतदारांना ओल्या पार्ट्याही दिल्या जात आहेत. 

पैठणीच्या प्रलोभनातून शिक्षक मतदाराला खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याने 'त्या' धनवान उमेदवाराच्या निषेधार्थ धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाजवळ पैठणीची होळी करण्यात आली. या प्रकाराचे उपस्थित अनेकांना आश्‍चर्य वाटले. यामागची वास्तव स्थिती समजल्यानंतर उपस्थितांनीही निवडणुकीतील गैरप्रकाराचा निषेध नोंदविला.

तसेच साड्या वाटून शिक्षक मतदारांकडे मते मागणाऱ्यांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत तळवे येथे साड्यांची होळी झाली. मतदार जागा झालाय, विकला जाणार नाही, तर विकत घेणाऱ्यांना धडा शिकवेल, अशी भूमिका संबंधित शिक्षकांनी मांडली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com