Angry Party workers lock Congress Bhavan in Sangli | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

सांगली : संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाला  ठोकले टाळे     

शेखर जोशी
शुक्रवार, 15 मार्च 2019

संतप्त कार्यकर्त्यांनी नेत्यांसमोरच काॅंग्रेस भवनाला   टाळे ठोकले.

सांगली: सांगलीची लोकसभेची जागा मित्रपक्षाला देण्यास विरोध करत संतप्त कार्यकर्त्यांनी नेत्यांसमोरच काॅंग्रेस भवनाला   टाळे ठोकले.

 सांगली आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. काग्रेस नेते विशाल पाटील समर्थकांनी टाळे ठोकले. तर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वत: टाळे काढले.     

तत्पुर्वी काॅंग्रेस कमिटीत नगरसेवक, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. देश स्वातंत्र्यानंतर केवळ एकदाच येथे पराभव झाला आहे. दादांचा हा बालेकिल्ला आहे. जागा काॅंग्रेसलाच मिळाली पाहिजे.

अन्यथा निवडणुकीपर्यंत कुलुप लावले जाईल असा इशारा कार्यकर्ते दरवाजाकडे धावले. कुलुप ठोकण्यापुर्वी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील तिथे आले. ते समजावून सांगत असतानाच टाळे ठोकून घौषणाबाजी झाली.

संबंधित लेख