anganwadi shivsena ministers | Sarkarnama

अंगणवाडीताईंच्या न्यायासाठी शिवसेना मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

मुंबई : अंगणवाडीताईंच्या पाठीशी शिवसेना ठाम असल्याचा शब्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. अंगणवाडी सेविकांच्या मोर्चात सहभाग घेत उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला होता. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना न्याय देण्यासाठी शिवसेना मंत्री सरसावले आहेत. आज शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेत शिवसेना मंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांना न्याय देण्याची मागणी केली. 

मंत्रीमंडळ बैठक सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या तुटपुंज्या मानधनात तातडीने वाढ करा, सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करा. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवरील रेल्वे पुलांची दुरुस्ती करावी, त्या ठिकाणच्या फेरीवल्याना हटवावे अशी मागणी शिवसेना मंत्र्यांनी केली. 

याबाबत माहिती देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, "" मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेतला जाईल. सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांच्या पूर्ण मानधन मिळावे याबाबत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रेल्वे समस्या सोडविण्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल. त्याचबरोबर रेल्वे ब्रिज फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश संबंधिताना देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.'' 
 
संबंधित लेख