डिवचले गेलेल्या अनंत गितेंनी सुनील तटकरेंना दिले प्रत्युत्तर

गिते आणि तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष आता सुरू झाला आहे.
डिवचले गेलेल्या अनंत गितेंनी सुनील तटकरेंना दिले प्रत्युत्तर

चिपळूण (रत्नागिरी): रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची भेट घेऊन शिवसेनेला डिवचले होते. आता त्यांचे प्रतिस्पर्धी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी माजी मुख्यमंत्री बॅ. अ. र. अंतुले यांचे पुत्र नविद अंतुले यांची भेट घेऊन "राष्ट्रवादी'ला प्रत्युत्तर दिले. 

या भेटीतून लोकसभा निवडणुकीत गिते आणि तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष आता सुरू झाला आहे. 

रायगडात शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार अनंत गिते उमेदवार असतील, हे शिवसेनेकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. 'राष्ट्रवादी'कडून तटकरे यांना संधी मिळणार हे निश्‍चित होते. संभाव्य उमेदवारी लक्षात घेऊन तटकरे आणि गिते एकमेकांवर टिकाटिप्पणी करायचे. पक्षाने तटकरे यांचे नाव निश्‍चित केल्यानंतर त्यांनी प्रथम रत्नागिरी जिल्ह्यात येऊन सूर्यकांत दळवी यांची भेट घेतली. दळवी हे शिवसेनेवर नाराज आहेत. गिते यांनी नविद अंतुलेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तटकरे यांना उत्तर दिल्याचे मानले जात आहे. 

 
बॅ. अ. र. अंतुले यांच्याशी माझे जवळचे संबंध होते. यासाठी आपण त्यांचा मुलगा नविद यांची भेट घेतली. 2019 मध्ये निवडून येण्यासाठी मला म्हसळासह रायगड जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते सहकार्य करतील. 
- अनंत गिते, 
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com