anadraj ambedkar agitation | Sarkarnama

आनंदराज आंबेडकरांचे नियोजित आंदोलन स्थगित 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुंबई : इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणीकरिता पुन्हा आंदोलन करण्यासाठी काही संघटना आक्रमक होण्याची दाट शक्‍यता आहे. 

स्मारकांच्या उभारणीसाठी रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. 

इंदू मिलच्या जागेवर स्मारक उभारण्याबाबत सरकार टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ 6 डिसेंबरला आनंदराज आंबेडकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र आज रात्री उशिरा झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांबाबत झालेल्या समाधानकारक चर्चेनंतर आंबेडकर यांनी आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. 

काही संघटनांमध्ये मात्र स्मारकाबाबत नाराजी आहे. त्यामुळे काही संघटना आक्रमक होण्याची शक्‍यता आहे. स्मारकाच्या संकल्पचित्राच्या आराखड्यात बदल करू शकतो. त्यामुळे आंदोलन करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यानुसार आंबेडकर यांनी आंदोलन स्थगित केले. या वेळी पोलिस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते. 

चैत्यभूमीवर गर्दी 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होऊ लागले आहेत; मात्र खेड्यापाड्यांतून आलेल्या अनुयायांनी सोमवारपासूनच शिवाजी पार्क परिसरात मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे चैत्यभूमी परिसरात गर्दी उसळली असून, अनुयायांसाठी मुंबई महापालिका, बेस्ट उपक्रम, विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांनी विविध सेवा-सुविधा पुरविल्या आहेत. 

भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या जाहीर सभा होणार असून, त्यासाठी चैत्यभूमी परिसर आणि शिवाजी पार्क परिसरात मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. बाबासाहेबांच्या जीवनावरील ग्रंथ, ध्वनिचित्रफिती, छायाचित्रे विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत. 

संबंधित लेख