अमृता फडणवीस यांचे मराठीत पार्श्वगायन

सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ‘अ ब क’ सारख्या वेगळ्या विषयावरील चित्रपटाची आज गरज आहे. मुला मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींना ही दर्जात्मक शिक्षण दिले पाहिजे. हे गीत प्रत्येक स्त्रिला प्रेरणादायी ठरेल. - अमृता फडणवीस
अमृता फडणवीस यांचे मराठीत पार्श्वगायन

पुणे: ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित व रामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित ‘अ ब क’ या मराठी चित्रपटासाठी अमृता देवेन्द्र फडणवीस यांनी नुकतेच पार्श्वगायन केले. ‘पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ असे गीताचे बोल असून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावरती भाष्य करणाऱ्या चित्रपटात त्यांनी मराठी आणि हिंदी अशी दोन गीते गायली आहेत. या गीतांना प्रसिद्ध संगीतकार बापी – टूटूल यांनी संगीतबद्ध केले असून मराठी गीत अश्विनी शेंडे तर हिंदी गीत शामराज दत्ता यांनी लिहले आहे.

या वेळी अमृता फडणवीस म्हणाल्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ‘अ ब क’ सारख्या वेगळ्या विषयावरील चित्रपटाची आज गरज आहे. मुला मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींना ही दर्जात्मक शिक्षण दिले पाहिजे. हे गीत प्रत्येक स्त्रिला प्रेरणादायी ठरेल. अशी भावना व्यक्त अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.

‘अ ब क’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार गोरखनाथ शेडगे हे असून चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांचे आहे. पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ या गीताचे अनावरण ५ ऑगस्ट रोजी बंगळूर येथे श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात श्री श्री रविशंकर, किरण बेदी, अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com