आमदार अमरिश पटेलांनी करून दाखवलं! मिशन वाॅटर मीटरमध्ये शिरपून नंबर वन!!

आमदार अमरिश पटेलांनी करून दाखवलं! मिशन वाॅटर मीटरमध्ये शिरपून नंबर वन!!

धुळे : जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्न'व्दारे तालुका टॅंकरमुक्त केल्यानंतर आमदार अमरिशभाई पटेल यांनी शहरी क्षेत्रात पाण्याचे मोल कळावे म्हणून मिशन वॉटर मीटर हाती घेतले. त्याची शंभर टक्के यशस्वी अंमलबजावणी केली. त्यामुळे रोज दोन लाख लिटर पाण्याची बचत होऊ लागली आहे. राज्यातील "ब' वर्ग नगरपालिकांमध्ये या मिशनने प्रथम स्थान पटकावले आहे.

सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षण आणि पाण्याशिवाय तरणोपाय नाही हे जाणून आमदार पटेल यांनी या क्षेत्रात भरीव कार्य केले. शिरपूरची लोकसंख्या सरासरी 76 हजारांवर आहे. चोवीस तास आणि बिसलरी पाणीपुरवठा करणारी पालिका म्हणून शिरपूरची सर्वत्र कीर्ती आहे. पाठोपाठ आमदार पटेल यांनी शिरपूर पालिका क्षेत्रात शंभर टक्के म्हणजेच चौदा हजार वॉटर मीटर बसविण्याची कार्यवाही पूर्ण करून घेतली आहे.

नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, मुख्याधिकारी अमोल बागूल यांच्या सहकार्याने मिशन वॉटर मीटर यशस्वीपणे अमलात आणण्यात आले. मालमत्ताधारकाला दरमहा प्रती मीटर तीस रुपये भाडे दर आकारणी होत आहे. एका कुटुंबाला सरासरी 1548 रुपये पाणीपट्टी येत आहे. पूर्वी ती सोळाशे रुपये होती. भूमिगत गटार योजना झालेल्या पालिका क्षेत्रात दरडोई प्रती माणसी सरासरी 135 लिटर पाणीपुरवठ्याचा निकष आहे.

याबाबत पुढचे पाऊल टाकत शिरपूर पालिका सरासरी 150 लिटर पाणी पुरवठा करीत आहे. नागरिकांची नाराजी दूर करत त्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिल्याने मिशन वॉटर मीटरची यशस्वी अंमलबजावणी करता आली. सर्वांच्या सहकार्यामुळे राज्यात "ब' वर्ग पालिकांमध्ये शिरपूर "टॉप'ला असल्याचे आमदार अमरिशभाई पटेल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com