मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अंजनगावसुर्जी येथील एका शेतकऱ्याने शेतीच्या वादातून 2008 मध्ये स्वतःला पेटवून आत्महत्या केली होती. त्या घटनेची पुनरावृत्ती खासगी सुरक्षा रक्षक व तैनात पोलिसांच्या सतर्कतेने टळली.
amravati-self-immolation-attempt
amravati-self-immolation-attempt

 अमरावती :  मराठा आरक्षणासाठी एका व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गुरुवारी (ता. दोन) दुपारी 2 वाजताच्या सुमारास अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. खासगी सुरक्षारक्षक व पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. 

#Maratha Kranti Morcha

संजय महादेवराव कदम (वय 45, रा. वडाळी), असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. दुपारी दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी सभागृहात बैठक घेत असताना कार्यालयाच्या पूर्व प्रवेशद्वाराकडून संजय हा कचेरीच्या परिसरात धावत आला. "मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे', अशी घोषणा देत त्याने मिनीरल वॉटरच्या बॉटलमध्ये आणलेले केरोसीन अंगावर घेतले. 

खासगी सुरक्षा रक्षक प्रमोद माहुरकर व तैनात पोलिस कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही क्षणातच त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर नियंत्रण मिळविले. गाडगेनगर पोलिसांनी संजय कदम याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. संजय कदम याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई व आत्महत्येचा प्रयत्न केल्याबाबतचा गुन्हा नोंदविला जात असल्याचे गाडगेनगरचे ठाणेदार मनिष ठाकरे यांनी सांगितले. 
 
"मराठे मेले नाहीत, शहीद झालेत. आम्हीसुद्धा शहीद होऊन जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज तमाम हिन्दूसाठी लढले. आता हे सरकार मराठा आरक्षणासाठी केवळ तारखेवर तारीख देत आहे. या प्रकाराला त्रासून आत्मदहन करीत आहे. आम्ही कुणालाही मारणार नाही. देशातील एक-एक नागरिक आमचा बांधव आहे,' असे संजय कदम पोलिसांना ओरडून सांगत होते . 

संजय कदम हा अत्यंत संवेदनशील स्वभावाचा सर्वसामान्य कुटुंबाचा सदस्य आहे. तो एमआयडीसीमध्ये कामाला जातो. शिवाय मिरची, मसाल्याचा गृहउद्योग चालवितो, अशी माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडलेल्या या प्रकारानंतर एक फौजदार व पाच कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी घेतला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com