amravati-raj-thakare-vidarbh-tour | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

राज ठाकरेंना आता विदर्भाची भुरळ 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल पाच दिवस अमरावती व मेळघाटमध्ये मुक्काम ठोकणार आहेत. 

अमरावती  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल पाच दिवस अमरावती व मेळघाटमध्ये मुक्काम ठोकणार आहेत. 

अंबा फेस्टिव्हलच्या निमित्ताने आयोजित प्रकट मुलाखतीला ते उपस्थित राहणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ते चिखलदरा व कोलकासचे निसर्गसौंदर्य अनुभवणार आहेत. 

17 ऑक्‍टोबरला सकाळी 8 वाजता अंबा एक्‍स्प्रेसने त्यांचे अमरावतीला आगमन होईल. पदाधिकाऱ्यांशी बातचीत केल्यानंतर सायंकाळी अंबा फेस्टिव्हलला उपस्थित राहून नंतर 18 ऑक्‍टोबरला दुपारी चिखलदऱ्याकडे प्रयाण करतील. 

चिखलदऱ्याचा मुक्कामानंतर 19 ऑक्‍टोबरला कोलकासला जातील. राजकीय घाईगर्दीत उसंत काढत मनसेप्रमुख अडीच दिवस विदर्भाच्या नंदनवनात घालविणार आहेत. 21 ऑक्‍टोबरचा संपूर्ण दिवस अमरावती येथे कार्यकर्त्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, कलावंत व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आला. विविध विषयांवर या वेळी ते चर्चा करतील, अशी माहिती मनसेच्या शेतकरी सेनेचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी रविवारी (ता. सात) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

दिवाळीनंतर विदर्भ दौरा 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिवाळीनंतर संपूर्ण विदर्भाचा दौरा करणार असून; या दौऱ्यात ते पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

संबंधित लेख