amravati politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट
राजस्थानमध्ये काॅंग्रेस 91 तर भाजप 70 जागांवर आघाडीवर
रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजिनामा
अहमदनगर निकाल - भाजप - 14, शिवसेना - 22, राष्ट्रवादी - 20, कॉंग्रेस - 5, बसप - 4, सपा - 1, अपक्ष - 2
मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई हायकोर्ट परिसरात हल्ला
ब्रम्हपुरी नगरपरिषद- नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवार सौ. रिताताई दीपक उराडे यांचा ८०२० मतांनी विजय
रिसोड नगरपरिषद - नगराध्यक्ष पदी जन विकास आघाडीच्या विजयमाला आसनकर विजयी
लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत, 17 पैकी 13 जागी भाजप विजयी, नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार विजयी, काँग्रेस चार जागी विजयी

अमरावती कॉंग्रेसला नागपूरची "लागण' 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 मे 2017

कॉंग्रेस पक्षाच्या नागपूर शहराध्यक्षाच्या नियुक्तीवरून वाद सुरू असताना आता या वादाची लागण अमरावती कॉंग्रेसला झाली आहे. अमरावती शहर कॉंग्रेस अध्यक्षपदी किशोर बोरकर यांची अनपेक्षितपणे नियुक्ती झाल्याने गटबाजीला उधाण आले आहे. असंतुष्ट गटांनी मुंबई गाठली आहे. 

नागपूर : कॉंग्रेस पक्षाच्या नागपूर शहराध्यक्षाच्या नियुक्तीवरून वाद सुरू असताना आता या वादाची लागण अमरावती कॉंग्रेसला झाली आहे. अमरावती शहर कॉंग्रेस अध्यक्षपदी किशोर बोरकर यांची अनपेक्षितपणे नियुक्ती झाल्याने गटबाजीला उधाण आले आहे. असंतुष्ट गटांनी मुंबई गाठली आहे. 

गेल्या एक वर्षापासून अमरावती शहर कॉंग्रेस अध्यक्षपदाचा वाद सुरू आहे. शहरातील शेखावत व देशमुख गटातून विस्तव जात नसल्याने नियुक्ती होऊ शकली नव्हती. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनीही एकदा अमरावतीला भेट देऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. यानंतरही दोन्ही गटामध्ये तह होऊ शकला नव्हता. नागपूर शहरातही शहराध्यक्षपदावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. हा वाद प्रदेशाध्यक्षांना सोडविता आला नाही. नागपूरच्या गटबाजीची लागण आता अमरावती शहर कॉंग्रेसला झाली आहे. 

या गटबाजांना दूर ठेवत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी माजी नगरसेवक व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर बोरकर यांची शहराध्यक्षपदी निवड झाली आहे. किशोर बोरकर गेल्या 25 वर्षांपासून कॉंग्रेसमध्ये सक्रिय असून कॉंग्रेसच्या नगरसेवक म्हणूनही ते निवडून आले आहेत. ते कोणत्याही गटाशी जुळलेले नसून कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. एसटीत कंडक्‍टर म्हणून काम केलेल्या बोरकर यांनी लवकरच नोकरीला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी अपंगांसाठी संस्था स्थापन करून जनहितांची कामे केली. 

बोरकर यांच्या नियुक्तीचे वृत्त थडकल्याबरोबर अमरावती शहरातील शेखावत गट व देशमुख यांच्या नेत्यांनी मुंबई गाठली आहे. बोरकर यांची निवड रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. आता या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे नाहीत. 

संबंधित लेख