amravati politics | Sarkarnama

अमरावती सभापतिपदावर कॉंग्रेसचा वरचष्मा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 एप्रिल 2017

जिल्हा परिषद विषय समिती सभापतींच्या झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीचा वरचष्मा राहिला. चारही सभापतिपदे सत्ताधारी आघाडीला मिळाली. त्यामुळे आता अध्यक्ष व उपाध्यक्षांनंतर विषय समिती निवडणुकीच्या माध्यमाने जिल्हा परिषदेत कॉंग्रेस आघाडीची निर्विवाद सत्ता स्थापन झाली. 

नागपूर : जिल्हा परिषद विषय समिती सभापतींच्या झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीचा वरचष्मा राहिला. चारही सभापतिपदे सत्ताधारी आघाडीला मिळाली. त्यामुळे आता अध्यक्ष व उपाध्यक्षांनंतर विषय समिती निवडणुकीच्या माध्यमाने जिल्हा परिषदेत कॉंग्रेस आघाडीची निर्विवाद सत्ता स्थापन झाली. 

समाजकल्याण समिती सभापतिपदी राष्ट्रवादीच्या सुशीला राजाभाऊ कुकडे, महिला बालकल्याण सभापतिपदी कॉंग्रेसच्या वनिता पाल, तसेच अन्य दोन विषय समिती सभापतींकरिता कॉंग्रेसचे जयंत देशमुख व आरपीआयचे बळवंत वानखडे विजयी झाले. या दोन्ही सभापतींना विशेष सभेत खातेवाटप करण्यात येईल. विजयी झालेल्या कॉंग्रेस, सेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रत्येकी 33; तर विरोधी भाजप उमेदवारांना 26 मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्यात आल्याने या वेळी एकही सभापतिपद मिळालेले नाही. कॉंग्रेस आघाडीत एका अपक्ष सदस्याची भर पडली. 

संबंधित लेख