अमरावती महापालिकेत राजाश्रय मिळवून कंत्राटदारांचे दबावतंत्र

अमरावती महापालिकेला कंत्राटावर कुशल, अकुशल व अर्धकुशल कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मनुष्यबळ पुरविणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा लागली आहे. आपल्या संस्थेला कंत्राट मिळावे, यासाठी राजकीय आश्रय मिळवण्याचीही स्पर्धा तीव्र असून कंत्राट पदरी पाडण्यासाठीकंत्राटदारांनी 'रिंग' पद्धत सुरू केली आहे.
अमरावती महापालिकेत राजाश्रय मिळवून कंत्राटदारांचे दबावतंत्र

अमरावती : अमरावती महापालिकेला कंत्राटावर कुशल, अकुशल व अर्धकुशल कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मनुष्यबळ पुरविणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा लागली आहे. आपल्या संस्थेला कंत्राट मिळावे, यासाठी राजकीय आश्रय मिळवण्याचीही स्पर्धा तीव्र असून कंत्राट पदरी पाडण्यासाठी
कंत्राटदारांनी 'रिंग' पद्धत सुरू केली आहे. 

कंत्राट पदरी पाडून घेण्यासाठी कंत्राटदारांमध्ये स्पर्धा चांगलीच तीव्र आहे. पालिकेतील दबंग पदाधिकाऱ्यांचा त्यासाठी आश्रय घेण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील या
पदाधिकाऱ्यांची खलबते सुरू आहेत. कंत्राटदारांनीही रिंग केली असून माघार घेण्यासाठी एकमेकांची सहमती व दबावतंत्राचा वापर सुरू झाला आहे. यावेळी प्रथमच या कंत्राटासाठी स्पर्धा रंगली आहे.

महापालिकेस कर्मचारी भरती करता येत नसल्याने अनेक कामे आउटसोर्सिंगने करावी लागतात. यासाठी खासगी संस्थांकडून मनुष्यबळ पुरवठा करण्यास कंत्राटावर मनुष्यबळाची मागणी करण्यात येते. मनपाने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत सात कंत्राटदारांनी सहभाग घेतला. त्यांच्या तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या असून आर्थिक तपासणी येत्या एक-दोन दिवसांत होणार आहेत.

सुमारे पाच कोटी रुपये वार्षिक मूल्याच्या कंत्राटासाठी महापालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत बेरोजगारांची क्षितिज नागरिक सेवा सहकारी संस्था, हिंदुस्थान सिक्‍युरिटी ऍण्ड इंटेलिजन्स सर्व्हिस, जानकी सुशिक्षित बेरोजगार नागरी सेवा सहकारी संस्था, श्री नागरिक सेवा सहकारी संस्था, युवा प्रहार स्वयंरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्था या अमरावतीच्या कंत्राटदारांसह नागपूर येथील टायगर सिक्‍युरिटी फोर्स नागपूर व युनिव्हर्सल फॅसिलिटीज ऍण्ड मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपन्यांचा सहभाग आहे.

मनपातील आरोग्य, बांधकाम, लेखा, सामान्य प्रशासन या विभागांसह झोन कार्यालयांमध्ये लिपिक, निरीक्षक अशा पदांसह सुरक्षा रक्षकांसाठी मनुष्यबळ मागविण्यात आला आहे. जवळपास 258 पदे कंत्राटी पद्धतीने भरायची असून त्यामध्ये कुशल, अकुशल व अर्धकुशल, अशी विभागणी आहे. पदनिहाय वेतन देण्यात येणार आहे. त्यासाठी वार्षिक 5 कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने केली आहे. निविदा प्रक्रियेत सहभागी कंत्राटदारांच्या तांत्रिक बाजू तपासण्यासाठी कागदपत्रांची तपासणी समितीने केली आहे. आर्थिक निकषही समिती येत्या  दोन दिवसांत तपासणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com