अमरावतीत अद्यापही निवडणुकीचा म्हणावा तसा `माहौल' नाही 

विदर्भात पहिल्या टप्प्यात सात लोकसभा मतदारसंघांत मतदान आटोपले. दुसऱ्या टप्प्यात अकोला, बुलडाण्यासह अमरावतीमध्ये येत्या 18 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचारतोफा थंडावण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण अद्यापही निवडणुकीचा पाहीजे तसा `माहौल' तयार झाला नाही, अशी चर्चा जनमाणसांत होत आहे आणि तसेच चित्रही आहे.
अमरावतीत अद्यापही निवडणुकीचा म्हणावा तसा `माहौल' नाही 

नागपूर : विदर्भात पहिल्या टप्प्यात सात लोकसभा मतदारसंघांत मतदान आटोपले. दुसऱ्या टप्प्यात अकोला, बुलडाण्यासह अमरावतीमध्ये येत्या 18 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचारतोफा थंडावण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण अद्यापही निवडणुकीचा पाहीजे तसा `माहौल' तयार झाला नाही, अशी चर्चा जनमाणसांत होत आहे आणि तसेच चित्रही आहे. 

अमरावतीसह पश्‍चिम विदर्भात नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांची एकही सभा झाली नाही. अमरावतीमध्ये आतापर्यंत राजनाथसिंग, शिवराजसिंग चव्हाण, असदुद्दीन ओवेसी, प्रकाश आंबेडकर यांच्या सभांसह उद्धव ठाकरे यांचा एक कार्यकर्ता मेळावा झाला. पण आजवर झालेल्या या सभांमुळे निवडणुकीची पाहीजे तशी वातावरण निर्मिती झाली नसल्याचे चित्र आहे. याशिवाय 16 एप्रिलला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. महाआघाडी आणि महायुतीच्या राष्ट्रीय नेत्याची अद्याप एकही सभा न झाल्याने कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उत्साह संचारला नसल्याचे सांगण्यात येते. आज सायंकाळी आनंदराव अडसुळ यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस यांची सभा झाली. ही राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक असल्याचे त्यांनी म्हण्टले. आजच्या या सभेनंतर किमान परतवाड्‌यात तरी वातावरण निर्मिती झाल्याचे दिसतेय.
 
पाच वर्षातला जनसंपर्क, वाटप कार्यक्रमांच्या भरवशावर राणांचा लढा अमरावती लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थीत उमेदवार नवनित राणा यांनी गेल्या पाच वर्षांपासूनच या निवडणुकीची तयारी चालविली आहे. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमांसह विविध सामाजिक कार्यक्रम सातत्याने राबवून सतत पाच वर्ष त्या जनतेच्या संपर्कात आणि चर्चेत राहील्या. पति आमदार रवी राणा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेऊन त्या ही लढाई लढत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com