विमानतळ घालविणाऱ्या आढळरावांना निवडणुकीत पळवून लावा : डॉ. कोल्हे

विमानतळ घालविणाऱ्या आढळरावांना निवडणुकीत पळवून लावा : डॉ. कोल्हे

मंचर : खेड तालुक्यातून विमानतळ पळवून लावल्यामुळे सव्वा लाख तरुणानांचा रोजगार बुडाला आहे. रक्त सांडले तरी चालेल, पण विमानतळ होऊ देणार नाही; अशी टोकाची भूमिका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सतत घेतली, अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे यांनी केली.

``अपयशाचे खापर ते नेहमीच दिलीप वळसे पाटील यांच्यावर फोडतात. ही सवय त्यांनी आता बदलली पाहिजे. देशात अनेक विमानतळे डोंगरी भागात आहेत. विमानतळ पळवून लावणारे आढळराव पाटील यांना लोकसभा निवडणुकीत पळवून लावण्याचे काम जनतेने करावे,'' असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले.

करंदी, पाबळ, केंदूर, कान्हूर मेसाई, खैरे नगर, धामारी हिवरे, खैरेवाडी येथे झालेल्या सभांमध्ये डॉ. कोल्हे बोलत होते. नियोजित कोपरा सभांना भर उन्हात जाहीर सभेचे स्वरूप आले होते. महिला व युवकांची संख्या लक्षणीय होती.

डॉ. कोल्हे म्हणाले, "पुणे- नाशिक रेल्वे शिरूर तालुक्यातून जाणारी होती. तसा सर्वे झाला होता. रेल्वेचा फायदा दूरवरच्या बाजारपेठेत शेतीमाल नेण्यासाठी शेतकऱ्यांना झाला असता. पण रेल्वेही या भागातून पळवून लावण्याचे काम आढळराव यांनीच केले आहे. विकासाच्या मुद्यावर बोलण्याऐवजी वैयक्तित टीकेवर भर दिला जातो. गेल्या १५ वर्षात जे झाले नाही. ती कामे दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावणार आहे.``

वळसे पाटील म्हणाले, "गेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात बैलगाडा शर्यती सुरु न झाल्यास खासदारकीचा राजीनामा देईल. अशी वल्गना आढळराव पाटील यांनी केली होती. विधानसभेत व विधानपरिषदेत बैलगाडा शर्यतीचे विधायक मंजूर करून घेण्याची जबाबदारी मी पार पाडली आहे. शिवसेना- भाजपचे बहुमत असल्याने लोकसभेत आढळराव पाटील यांनी व राज्यसभेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे बहुमत असल्याने बैलगाडा शर्यतीचे विधेयक मंजूर करून घेण्याची जबाबदारी जेष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली होती. लोकसभेत विधेयक दाखल व मंजूर झाले नाही. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचा प्रश्न प्रलंबित आहे. बैलगाडा मालकांची दिशाभूल करण्याचा उद्योग बंद करावा.''

मंगलदास बांदल, सविता बगाटे, प्रकाश पवार, सुभाष उमाप, अरुण चौधरी, रेखा बांदल, स्वाती पाचुंदकर, मानसिंग पाचुंदकर, नंदकुमार पिंगळे आदींची भाषणे झाली. यावेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com