अमोल कोल्हे माझे नातेवाईक नाहीत; मी आढळरावांनाच लीड देणार : आमदार सुरेश गोरे

अमोल कोल्हे माझे नातेवाईक नाहीत; मी आढळरावांनाच लीड देणार : आमदार सुरेश गोरे

हडपसर ः राष्ट्रवादीने एकट्या छगन भुजबळ यांच्याशिवाय सगळ्याच ओबीसी नेतृत्वावर अन्याय केलाय. या वेळी पूर्ण ताकदीने ओबीसी समाज खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचे आमदार योगेश टिळेकर यांनी हडपसर येथे सांगितले. 

शिरूर लोकसभा मतदारसंघातील ओबीसींचा मेळावा टिळेकर व सुरेश गोरे यांच्या पुढाकाराने नुकताच हडपसर येथे पार पडला. या वेळी टिळेकर बोलत होते. 

आढळराव म्हणाले, ""2014 मध्ये राष्ट्रवादीने सुरेश गोरे यांना केवळ ओबीसी नेते म्हणून डावलले. मात्र, शिवसेनेने त्यांना न्याय देत विधानसभेत पाठविले.'' या वेळी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विकास रासकर यांचे भाषण झाले. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव राजू केकाल, शिवसेना ओबीसी आघाडीचे नेते के. टी. आरू, नगरसेविका लता धायरकर, उज्ज्वला जंगले, जिल्हा परिषद सदस्या वंदना कोद्रे उपस्थित होत्या. 

आमदार सुरेश गोरे म्हणाले, ""सध्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार हे माझे पाहुणे असल्याचे सांगतात; पण हे त्यांनी लक्षात घ्यावे की, मी सच्चा शिवसैनिक आहे. त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सर्वाधिक मताधिक्‍य मी खेडमधून देणार आहे. हे मताधिक्‍य हडपसरपेक्षा जास्त असेल, हे मी योगेश टिळेकर यांनाही आवर्जून सांगतो.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com