amitabha bachhan and udyanraje come together | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

'दोन बच्चन' साताऱ्यात एकत्र येणार; अमिताभ यांचा 'शिवसन्मान' होणार! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 मे 2018

सातारा : मर्दानी खेळ, रॉक बॅण्ड, मराठी सारेगमप याचा त्रिवेणी संगम साधत साताऱ्यात राजधानी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. या महोत्सवाला सिने अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थिती लावणार आहेत, याची सातारकरांना उत्सुकता आहे. 

सातारा : मर्दानी खेळ, रॉक बॅण्ड, मराठी सारेगमप याचा त्रिवेणी संगम साधत साताऱ्यात राजधानी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. या महोत्सवाला सिने अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थिती लावणार आहेत, याची सातारकरांना उत्सुकता आहे. 

खासदार उदयनराजे भोसले फौंडेशन ऑफ कल्चरल ऍक्‍टिव्हीटी व पंकज चव्हाण डान्स ऍकॅडमी यांच्यावतीने साताऱ्यात 25 ते 27 मे या कालावधीत राजधानी महोत्सव 2018 होत आहे. यामध्ये अजिंक्‍यतारा किल्ल्यावर शिवशाहीचे दर्शन घडविणारा शिवजागर कार्यक्रम होणार आहे. यामध्ये छत्रपती शिवरायांची जीवनगाथा, लाठीकाठी खेळ, शिवकालिन शस्त्र प्रदर्शन, दांडपट्टा असे मर्दानीखेळ युवक युवती दाखविणार आहेत. 

शिवजागर महोत्सवाचे उद्‌घाटन राजामाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवाजीराजे भोसले, चंद्रलेखाराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावळ, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, नगराध्यक्षा माधवी कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

26 मे रोजी मराठी रॉक बॅण्डचा कार्यक्रम शाहू स्टेडियमवर होणार आहे. यामध्ये नामवंत गायक आपली कला सादर करणार आहेत. महोत्सवाचा मुख्य दिवस म्हणजेच 27 मे रोजी सामाजिक कार्यात वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या नामवंताचा "सातारा गौरव पुरस्कार' देऊन सन्मान केला जाणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध 12 क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींना सातारा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये एकुण 13 पुरस्कार दिले जाणार आहेत. हा कार्यक्रम शाहू स्टेडियम येथे सायंकाळी सहा ते दहा यावेळेत होणार आहे. 

छत्रपती घराण्याच्यावतीने शिवसन्मान पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रथमच देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन साताऱ्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ते उपस्थित राहिल्यास राजधानी महोत्सवात एक अभिनयातील बच्चन म्हणजेच अमिताभ बच्चन आणि सातारकरांच्यादृष्टीने राजकारणातील बच्चन म्हणजेच खासदार उदयनराजे भोसले यांना एकाच व्यासपीठावर पाहण्याचा योग सातारकरांना यानिमित्ताने मिळणार आहे. 
 

संबंधित लेख