अमिताभ बच्चन हुतात्मा जवानांच्या कुटुंबाना मदतीसाठी सरसावले 

अमिताभ बच्चन हुतात्मा जवानांच्या कुटुंबाना मदतीसाठी सरसावले 

मुंबई : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबांसाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रत्येक हुतात्मा जवानाच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलातील 40 जवान हुतात्मा झाले. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानला चोख प्रत्त्युत्तर दिलेच पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आहे. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतूनही शोकसंतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

 रिलायन्स फाऊंडेशन घेणार हुतात्म्यांच्या कुटुंबांची जबाबदारी
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या कुटुंबीयांची सर्व जबाबदारी घेण्याची तयारी नीता अंबानी यांच्या अध्यक्षतेखालील रिलायन्स फाऊंडेशनने दाखवली आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांची देखभाल तसेच मुलांचे शिक्षण व नोकरी मिळवून देण्याची जबाबदारी फाऊंडेशनतर्फे घेतली जाईल. आवश्‍यकतेनुसार जखमी जवानांवर रुग्णालयांत उपचार केले जातील. सरकार सोपवेल ती जबाबदारी फाऊंडेशन पार पाडेल, असे फाऊंडेशनच्या पत्रकात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com