शहनशाह अमिताभला हवी नोकरी 

 शहनशाह अमिताभला हवी नोकरी 

मुंबई : बॉलिवूडचा शहनशाह आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना नोकरीची गरज असून त्यांनी आपल्या ट्‌विटर अकाऊंटवर स्वतःच त्यांचा बायोडेटा पोस्ट केला आहे. जॉब ऍप्लिकेशन असे नाव देत हा बायोडेटा पोस्ट करण्यात आला आहे. बच्चन यांनी असे ट्‌वीट केल्याने त्यांच्या चाहत्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. 

अभिताभ यांना जर कोणी जॉब देऊ इच्छित असतील तर त्यांच्याशी कोणीही संपर्क साधू शकतो. खरे तर वयाची 75 पूर्ण केलेल्या या शहनशाहला नोकरीची गरज का वाटली ? हा प्रश्‍न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. एकेकाळी आर्थिक संकटात सापडलेल्या या अभिनेत्याला त्यांच्या मित्रांनी मदतीचा हात देत त्याला सुखरूप बाहेर काढले होते. आता मात्र ते आर्थिक दृष्ट्या भक्कम असावेत अशी माहिती आहे. तरीही त्यांना आज म्हातारपणात नोकरी का करावीशी वाटते ? बरं प्रसिद्धीच्या झोतात राहावे तर ते नेहमीच्या प्रसिद्धीच्या झगमगाटात आहेत. पण, तसे काही नाही. अभिताभ यांनी अवखळपणे हे ट्विट केले आहे. 

अभिताभ यांनी जी पोस्ट केली आहे त्यामध्ये त्यांनी त्यांचे नाव, किती सिनेमांमध्ये काम केले, कोणत्या भाषा बोलू शकतो, वय किती, उंची किती असे लिहिले आहे. 

एका वर्तमान पत्राने शाहीद कपूर आणि आमिर खान यांच्यासोबत सह अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांची उंचीमुळे निवड करता येत नाही अशी बातमी छापली आहे. 

खरेतर कतरिना कैफ आणि आमिर खान यांनी धूम थ्री मध्ये आणि शाहीद कपूर आणि दीपिका पदुकोण यांनी पद्मावत सिनेमात एकत्र काम केले आहे. तरीही ही बातमी छापण्यात आल्याने त्याची खिल्ली उडवत बच्चन यांनी आपला बायोडेटाच ट्‌विटरवर पोस्ट केला असल्याचे कळते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com