amit thakery listens father`s speech from gallery | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

राज हे भाजपवर तोफगोळे टाकत असताना अमित प्रेक्षकांत उभे राहून भाषण ऐकत होते...

वैदेही काणेकर
रविवार, 10 मार्च 2019

राजकीय नेत्यांची मुले थेट व्यासपीठावर जाऊन नेते होतात....पण अमित राज ठाकरे अजूनही श्रोत्यांत उभे राहून वडिलांचे भाषण ऐकतात..

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे हे काल व्यासपीठावरून भाजप सरकारवर तोफगोळे डागत असताना त्यांचे चिंरजीव अमित ठाकरे मात्र प्रेक्षकांत उभे राहून वडिलांचे भाषण ऐकत होते. राज यांच्याकडून थेट शिकवणी अमित यांनी घेतल्याची त्यामुळे चर्चा सुरू झाली.

अमित हे लग्नानंतर बहुधा पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. ते पण व्यासपीठावर नेता म्हणून नाही तर श्रोता म्हणून. राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची आधी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

त्यांनी लोकसभा निवडणुकीत कोणाशी युती करणार की नाही, याचा खुलासा केला नाही. मात्र भाजपविरोधातील आपली लढाई आक्रमकपणे लढण्याचे सूतोवाच त्यांनी केले. अमित हे आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाच्या व्यासपीठावरून भाषण करणार का, याची आता उत्सुकता आहे.

राज ठाकरे यांना एका मुलाखतीत अमित ठाकरे यांनी कोणाकडून राजकारणाचे धडे घ्यावेत, असा प्रश्न विचारला होता. त्यावर मी घरात गोट्या खेळतो का, असा प्रतिप्रश्न करत जोरदार टोला लगावला होता. आता कालच्या भाषणातून अमित यांनी कोणते धडे घेतले, हे लवकरच कळेल. 

संबंधित लेख