Amit Shaha writing book on Maratha history | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

अमित शहा लिहिणार मराठेशाहीवर पुस्तक 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 10 सप्टेंबर 2017

पुणे : भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे लवकरच मराठ्यांच्या इतिहासावर गुजरातीत पुस्तक लिहिणार आहेत. त्यासाठी त्यांनी अभ्यासही सुरू केला असून, आणखी काही पुस्तके वाचून झाल्यानंतर त्यांचे लिखाण सुरू होणार आहे. 

भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनीच ही माहिती आज पुण्यात दिली. "भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी,' या शहा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी सहस्त्रबुद्धे यांनी शहा यांच्या नवीन संकल्पाविषयी माहिती दिली. 

अमित शहांनी सहस्त्रबुद्धे यांच्याकडे काही दिवसांपूर्वी मराठ्यांच्या इतिहासावरील काही पुस्तके एका भेटीत मागितली. सहस्त्रबुद्धेंनी तातडीने 12 पुस्तके उपलब्ध करून दिली. त्यानंतर दोघांच्या झालेल्या भेटीत शहा यांनी त्यातील आठ पुस्तके वाचून पूर्ण झाल्याचे सांगितले. इतरही पुस्तके लवकरच वाचून पूर्ण होतील. त्यावर सहस्त्रबुद्धेंनी त्यांना विचारले की हा सारा अभ्यास कशासाठी करत आहात? त्यावर अमित शहा यांनी सहस्त्रबुद्धेंना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेची लूट इतकीच गुजरातमध्ये माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर गुजराती भाषेत लिखाण होण्याची गरज आहे. हे पुस्तक मी स्वतः लिहिणार असल्याचे शहांनी सहस्त्रबुद्धेंना सांगितले. शहा यांनी आणखी काही पुस्तके मागितल्याचे सहस्त्रबुद्धेंनी सांगितले. 

गुजरातमध्ये मराठ्यांचे राज्य होते. त्यावरही या निमित्ताने प्रकाशझोत टाकला जाणार आहे. गुजरातमधील मराठेशाहीचा इतिहास यावर आता शहांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे. 

संबंधित लेख