Amit Shaha to stay in Nagpur for RSS representative meet | Sarkarnama

अमित शहांचा आरएसएसच्या प्रतिनिधी सभेसाठी नागपुरात दोन दिवस मुक्काम

सुरेश भुसारी : सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय  प्रतिनिधी सभेच्या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सलग दोन दिवस नागपुरात थांबणार आहेत.अखिल भारतीय  प्रतिनिधी सभेला आजपासून नागपुरातील रेशिमबागेत सुरूवात झाली. 

नागपूर  : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय  प्रतिनिधी सभेच्या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सलग दोन दिवस नागपुरात थांबणार आहेत.अखिल भारतीय  प्रतिनिधी सभेला आजपासून नागपुरातील रेशिमबागेत सुरूवात झाली. 

या बैठकीला अमित शाह  सकाळी आठ  वाजता हजर राहणार होते. परंतु ते त्रिपुरा येथे गेलेले असल्याने ते येऊ शकले नाही. रात्री उशिरा त्यांचे नागपुरात आगमन झाले. शनिवार व रविवारला ते नागपुरात थांबणार आहेत. या दोन दिवसात राजकीय ठरावावर चर्चा होणार आहे. या चर्चेत ते पूर्णवेळ थांबणार असल्याचे समजते. अमित शहा दोन दिवस नागपुरात थांबणार असल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला.

आजच्या बैठकीला विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांची हजेरी विशेष राहिली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना झालेल्या अपघाताची माहिती दिली. परंतु यावर त्यांनी सविस्तरपणे बोलणे टाळले.

अ. भा. प्रतिनिधी सभेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्याजागी दुसऱ्यांची निवड होणार असल्याची चर्चा आहे .  भैय्याजी जोशी यांची प्रकृती चांगली नसल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्यांची निवड होणार असल्याचा युक्तीवाद केला जात होता. परंतु भैय्याजी जोशी कायम ठेवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित लेख