Amit Shaha Should resign : Chavan | Sarkarnama

भाजप अध्यक्ष अमित शहा यांना पायउतार व्हावे : पृथ्वीराज चव्हाण

संजय मिस्किन
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

यापूर्वी जैन हवालामधे लालकृष्ण अडवाणी यांनी, तहलका प्रकरणी बंगारू लक्ष्मण तर पूर्तीमधे नितीन गडकरी यांनी राजीनामे दिले होते. तिघेही भाजपचे अध्यक्ष होते. भाजप अध्यक्षांची अशी परंपरा असल्याचा टोलाही चव्हाण यांनी लगावला. त्यामुळे अमित शहा यांनीही पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबई :  भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलावर कंपनी कर्ज प्रकरणी संशयास्पद व्यवहाराचे आरोप झाले असून या आरोपांची सीबीआय, ईडी मार्फत चौकशी करावी. संपूर्ण व्यवहारासंबंधी त्यांचे निर्दोषत्व सिध्द होत नाहीत तोपर्यंत भाजपचे सर्वेसर्वा अमित शहा यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधे आयोजित पत्राकार परिषदेते चव्हाण यांनी अमित शहा व भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. द वायर वृत्तसंस्थेच्या वृत्तात कुठेही शहांवर आरोप करण्यात आलेला नाही. जय शहा यांच्या वकिलांचे मतही बातमी मधे दिलेलं आहे.  मात्र काॅंग्रेसचे या प्रकरणी काही आरोप असल्याचे स्पष्ट करत चव्हाण म्हणाले की 
जय यांनी 2004 मधे टेंपल इंटरप्राईज प्रा. लि. अशी कपंनी जितेंद्र शहा यांच्या सोबत सुरू केली. 2004 ते 2006 मधे काहीही कारभार नाही. 2015-16 मधे उलाढाल 80 कोटी 50 लाख रुपयांवर पोचली. तब्बल 16000 पटीने उलाढाल वाढली.

केआयएफएस ही कंपनी राजेश खांडवाला यांनी सुरू केली. ते परिमल नाथवाणी यांच्या जवळचे. राज्यसभेत भाजपच्या मदतीने. रिलायन्सच्या जवळचे. या कंपनीने 15 कोटीचे कर्ज जय शहा यांच्या कंपनीला कोणतेही तारण न करता दिले. 
सेबीने याच कंपनीला बंद का करू नये, अशी नोटीस दिली होती. जय शहा यांनी सांगितले की हे कर्ज नव्हते तर ते डिपांजिट होते. एकदम 80 कोटीचा धंदा केला त्यानंतर आॅक्टोबर 2016 ला कंपनी बंद करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

केंद्र सरकारने  8 नोव्हेंबर ला नोटाबंदी केली.  शेल कंपन्याना शोधण्याचे काम सुरू केले व दोन लाख कंपन्या बंद केल्याचे पीएम म्हणाले. अमित शहा यांच्या कंपनीला हे माहीत होते का, असा सवाल चव्हाण यांनी केला. 

रिलायन्स, निरमा या कंपन्या व भारत सरकारने या अनुभव नसलेल्या कंपनीला कर्ज दिले. धमक्या देवून हे प्रकरण थांबणार नाही. एका खासगी व्यक्तीची कंपनी असताना भारत सरकारच्या मंत्र्याने खुलासा करणे कितपत उचित आहे? 
पंतप्रधानानी खुलासा करायला हवा. संशयास्पद व्यवहार झाले आहेत. चौकशी ईडी, सीबीआय, पीएमपीएलने केली पाहिजे. 
यापुर्वी जैन हवाला मधे अडवाणी, तहलका प्रकरणी बंगारू लक्ष्मण तर पूर्तीमधे नितीन गडकरी यांनी राजीनामे दिले होते. तिघेही भाजपचे अध्यक्ष होते. भाजप अध्यक्षांची अशी परंपरा असल्याचा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

 त्यामुळे अमित शहा यांनी देखील राजीनामा द्यावा. या व्यवहारांची संपुर्ण निपक्षपाती चौकशी व्हावी. अरूण जेटली यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करावी. देशातील जनता उत्तर मागते आहे. असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख