amit shaha mumbai visit | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

अमित शहांचे बॅनर्स मुंबई महानगरपालिकेने उतरविले

तुषार खरात
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई : अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यामुळे अत्यानंद झालेल्या भाजप पदाधिका-यांनी मुंबईभर रस्त्याच्या दुतर्फा फलक लावले आहेत. पण शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेने हे फलक उतरवण्याची मोहिम राबविली आहे. 

विशेष म्हणजे, अमित शहा हे उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचा भाजपवरील राग कमी होण्याची अटकळ बांधली जात होती. पण शहा यांचे फलक उतरविण्याचा सपाटा महापालिकेने लावल्यामुळे सेनेचा राग कमी झाला नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

अमित शहा यांचे बहुतांश कार्यक्रम व मुक्काम सह्याद्री अतिथी गृह, मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान या ठिकाणी आहेत. महापालिकेने नेमके याच परिसरातील फलक उतरविले आहेत. या कारवाईमुळे शहा यांच्या स्वागतासाठी आसुसलेल्या भाजप पदाधिका-यांच्या उत्साहावर विरजण पडणार आहे. 

याबाबत शिवसेनेच्या मुख्य प्रवक्‍या आमदार नीलम गोऱ्हे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, राज्यभरामध्ये होर्डिंग्जबाबत (आकाशचिन्हे) राज्य सरकारने धोरण तयार केले आहे. त्यानुसार प्रशासन होर्डिंगसंदर्भात कारवाई करत असते. या प्रकरणामध्ये शहा यांचे फलक का काढण्यात आले हे मुंबई महानगरपालिका प्रशासन प्रमुख या नात्याने आयुक्त अजोय मेहता अधिक सांगू शकतील. राज्यभरामध्ये आलेला अनुभव असा आहे की, व्यापारी व उद्योजक यांच्या होर्डिंग्जवर प्रशासन ब-याचदा कारवाई करीत नाही. पण राजकीय पक्षांच्या होर्डिंग्जवर मात्र कारवाई केली जाते. शिवसेनेच्या होर्डिंग्जवर सुद्धा कारवाई होत असते. त्यामुळे या कारवाईबद्दल आयुक्त किंवा संबंधित अधिकारी अधिक सांगू शकतील. 

संबंधित लेख