amit shaha and bjp in mp | Sarkarnama

अमित शहा यांच्या रोड शोसाठी तीनशे क्विंटल फुलांची ऑर्डर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

इंदोर : देशातली पाच राज्यातील निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे, काही राज्यात मतदानही पूर्ण झाले आहे. मध्यप्रदेशात यावेळी अटीतटीच्या लढती आहेत. त्या राज्यातील प्रचाराची मुदत 26 नोव्हेंबरला संपत आहे, याचदिवशी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा 26 नोव्हेंबरला रोड शो होणार आहे. इंदोर शहरातील प्रमुख मार्गावरून होणाऱ्या या दीड किलोमीटरच्या रोड शो साठी मध्यप्रदेश मधील भाजपचे कार्यकर्ते व नेते जोरदार मेहनत घेत आहेत. या रोड शो साठी पक्षाने 300 क्विंटल फुलाची ऑर्डर दिली असून ही सारी फुले रोड शोच्या मार्गावरील दुकाने व घरामध्ये वाटण्यात येणार आहेत.

इंदोर : देशातली पाच राज्यातील निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे, काही राज्यात मतदानही पूर्ण झाले आहे. मध्यप्रदेशात यावेळी अटीतटीच्या लढती आहेत. त्या राज्यातील प्रचाराची मुदत 26 नोव्हेंबरला संपत आहे, याचदिवशी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा 26 नोव्हेंबरला रोड शो होणार आहे. इंदोर शहरातील प्रमुख मार्गावरून होणाऱ्या या दीड किलोमीटरच्या रोड शो साठी मध्यप्रदेश मधील भाजपचे कार्यकर्ते व नेते जोरदार मेहनत घेत आहेत. या रोड शो साठी पक्षाने 300 क्विंटल फुलाची ऑर्डर दिली असून ही सारी फुले रोड शोच्या मार्गावरील दुकाने व घरामध्ये वाटण्यात येणार आहेत. ही फुले अशाकरता वाटली जाणार आहेत की ही मंडळी ही फुले शहा यांना देतील व त्यांचे स्वागत करतील. 

मध्यप्रदेशात पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी शिवराजसिंग चौहान आणि भाजपचे वरिष्ठ नेते ताकदीने प्रचारात उतरले आहेत. अमित शहा यांनी हे राज्य पिंजून काढले आहे. शिवराजसिंह चौहान यांचे संपूर्ण कुटुंब निवडणूक प्रचारात उतरले आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी होणाऱ्या या रोड शोच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यासाठी मध्यप्रदेश भाजपने कंबर कसली असून हा रोड शो यशस्वी करण्यासाठी पक्ष प्रयत्न करत आहे. 

संबंधित लेख