amit shaha | Sarkarnama

शहा यांचा महाराष्ट्र दौरा : भाजप आमदार धास्तावले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मे 2017

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात आगामी 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला जाणार आहे मात्र या दौऱ्याआधी खासगी व्यक्तींमार्फत मतदार संघातील सद्यस्थितीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याने स्थानिक भाजप आमदाराने याचा धसका घेतला आहे. 

राज्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदार संघातील इत्यंभूत राजकीय स्थितीची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे 16 ते 18 जून या दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर असताना जाणून घेणार आहेत.

भाजपच्या मंत्री आणि विद्यमान आमदार - खासदारांना आपल्या मतदारसंघात भाजपची बलस्थाने कोणती तसेच कमकुवत बाजू कोणत्या आहेत याची माहिती घेण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून दिले गेले आहेत.

त्यानुसार प्रत्येक आमदारांनी आपला अहवाल तयार करून भाजप प्रदेश कार्यकारिणीत सादर करायला सांगितले आहे. दरम्यान मतदार संघातील माहिती जमा करत असताना काही मतदार संघात खासगी व्यक्तींकडूनही भाजपच्या सद्य राजकीय परिस्थितीची माहिती काही लोकांशी बोलून सर्वेक्षणाच्या माध्यमातून केला जात असल्याचे निदर्शनास आले आहेत त्यामुळे ही माहिती कोण गोळा करत असावे यावरून भाजपच्या आमदारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. 

खासगी यंत्रणेमार्फत महाराष्ट्रातील राजकीय तसेच सामाजिक प्रश्नांचे सर्वेक्षण सुरू असेल तर आपण पक्षाकडे मतदार संघातील दिलेली माहिती अचूक ठरली नाही तर पक्ष नेतृत्वाच्या नजरेत कमी पडू असा धसका काही आमदारांनी आतापासून घेतल्याचे सूत्रांकडून समजते. 

संबंधित लेख