Amit Shah & Udhhav Thakre discuss Maratha reservation issue | Sarkarnama

 मराठा आरक्षण आंदोलनावर अमित शहा - उध्दव ठाकरे यांच्यात चर्चा

संजय मिस्कीन 
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षण आंदोलनाचा पेच यावर दोन्ही नेत्यामधे सविस्तर चर्चा झाल्याचाही दावा सुत्रांनी केला. राज्यातील सामाजिक परिस्थीती व कायदा सुव्यवस्थेवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फोन करून अनेक विषयांवर चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनासोबतच राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडी बाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

मराठा आरक्षण आंदोलनाचा पेच यावर दोन्ही नेत्यामधे सविस्तर चर्चा झाल्याचाही दावा सुत्रांनी केला. राज्यातील सामाजिक परिस्थीती व कायदा सुव्यवस्थेवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

शिवाय, राज्यसभा उपसभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. यामधे युपीए विरूध्द एनडीए असे चित्र उभारले असल्याने भाजप पुरस्कृत एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मिळावा. यावरही दोन्ही नेत्यानधे संवाद झाल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, राज्य मंत्रीमंडळ विस्तार - फेरबदल यासह राज्यातील इतर राजकिय प्रश्नांवर देखील चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या सर्व मुद्द्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा लवकरच बैठक होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख