amit shah said help us, sanjay raut said you will have talk with udhhav thackrey | Sarkarnama

अमित शाह म्हणाले मदत करा; संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंशी बोला! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी आधी सभागृहातच खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधून या निवडणुकीत भाजपबरोबर राहण्याचे आवाहन केले. त्यावर संजय राऊत यांनी सर्व निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेत असल्याने त्यांच्याशीच बोलावे लागेल असे सांगितले. त्यानंतरच अमित शाहंचा उद्धव ठाकरे यांना फोन गेल्याचे समजते. 

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी आधी सभागृहातच खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधून या निवडणुकीत भाजपबरोबर राहण्याचे आवाहन केले. त्यावर संजय राऊत यांनी सर्व निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेत असल्याने त्यांच्याशीच बोलावे लागेल असे सांगितले. त्यानंतरच अमित शाहंचा उद्धव ठाकरे यांना फोन गेल्याचे समजते. 

विरोधी पक्षांतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वंदना चव्हाण यांची उमेदवारी समोर आलीतर मराठी उमेदवार म्हणून शिवसेनेची सहानुभूती त्यांना राहण्याची शक्‍यता होती. मात्र नवीन पटनाईक आणि नितीशकुमार यांच्यातील संवादानंतर निवडणुकीतील चुरस संपून केवळ औपचारिकता उरली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ही औपचारिक निवडणूक लढविण्यात रस नव्हता. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आपला उमेदवार पुढे करावा लागला. निवडणूक बिनविरोध होवू नये यासाठी हा उमेदवार कॉंग्रेस पक्षाने दिला आहे. 

एनडीएच्या उमेदवाराचा विजय जवळपास निश्‍चित झालेला असतानाही अमित शाह यांनी शिवसेना हा आपला मित्रपक्ष सोबत आहे, हा मेसेज राजकीय वर्तुळात जावा यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून त्यांचा पाठिंबा मिळवला असल्याचे समजते. एनडीएचा घटक असलेला तेलगू देसम पक्ष हा कॉंग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारविरोधी पक्षांच्या आघाडीला जावून मिळालेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेला येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्व प्राप्त झालेले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख