कर्नाटकातील आनंदाचे कारण कॉंग्रेस-जेडीयूने स्पष्ट करावे : अमित शहा 

कर्नाटकातील आनंदाचे कारण कॉंग्रेस-जेडीयूने स्पष्ट करावे : अमित शहा 

नवी दिल्लीः कर्नाटकमध्ये कॉंग्रेसने भ्रष्टाचार केला असून, जनता त्यांच्यावर नाराज आहे. कॉंग्रेस-जेडीएसने आनंदाचे कारण स्पष्ट करावे. कर्नाटकमध्ये सरकार स्थापन झाल्यावर आता कॉंग्रेसला ईव्हीएम, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगही चांगले वाटू लागले आहे, अशी टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज केली. 

पत्रकार परिषदेत कॉंग्रेस व जेडीएसवर टीका करताना शहा म्हणाले, "" कर्नाटकमध्ये बहुमत आम्हालाच असून, सरकार स्थापन करण्यासाठी दावेदारही आम्हीच होतो. कॉंग्रेस-जेडीएस आज आनंदोत्सव साजरा करत आहे. परंतु, कोणत्या गोष्टीबद्दल आनंद साजरा करत आहेत. पूर्वीपेक्षा त्यांच्या जागा कमी झाल्या असून, मुख्यमंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांनी आनंदाचे कारण स्पष्ट करावे. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसने मोठा भ्रष्टाचार केला असून, जनता त्यांच्यावर नाराज आहे. जनतेने त्यांना नाकारले आहे. मोदी सरकारने कर्नाटकसाठी मोठे काम केले असून, तेथील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून केलेल्या मतदानाबद्दल आभारी आहोत.'' 

भाजपने कॉंग्रेसकडून 14 राज्ये खेचून घेतली असून, भाजपने फक्त नऊ पोटनिवडणूका गामवल्या आहेत. यामुळे 14 राज्य महत्त्वाची की नऊ पोटनिवडणूका महत्त्वाच्या हे कॉंग्रेसने सांगावे, असा टोला शहा यांनी लगावला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com