Amit Shah pays respect to Siddhi Vinayak | Sarkarnama

अमित शहांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन  

सरकारनामा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

शहा यांचा मुंबई दौरा हा केवळ गणपती दर्शनपुरताच  मर्यादित असल्याचे भाजपच्या गोटातून  सांगण्यात आले .

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज शुक्रवारी एक दिवसाच्या मुंबई भेटीवर आले असून शहा यांनी मुंबईतील लालबागचा राजा या सार्वजनिक गणेश मंडळाला सपत्निक दर्शन घेतले.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दरवर्षी मुंबईतील प्रसिध्द अशा लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. त्यामुळे ते मुंबईच्या भेटीवर आले. आज शुक्रवारी दुपारी 12 वाजता त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बांद्रा येथे गेले. 

तेथील दर्शन उरकून ते दादर येथील सिद्धिविनायक  मंदिरात दर्शनासाठी गेले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर सहपत्निक शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार राज पुरोहित आदी उपस्थित होते. शहा यांचा मुंबई दौरा हा केवळ गणपती दर्शनपुरताच  मर्यादित असल्याचे भाजपच्या गोटातून  सांगण्यात आले .

 

 

संबंधित लेख