amit shah meeting with nda party | Sarkarnama

मेटे साहब, आपके  उपर हमारा ध्यान है ! 

गोविंद तुपे 
शनिवार, 17 जून 2017

मुंबई ः भाजप सत्तेत येऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र घटक पक्षातील शिवसंग्राम पक्षाला काहीच मिळाले नसल्याची खंत या पक्षाचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या समोर बोलून दाखविली. त्यावर मेटे साहब, आपके उपर हमारा ध्यान है ! आपको भीमोका मिलेगा असे सांगून त्यांनी बोळवण केल्याचे समजते. 

तीन दिवस मुंबई दौऱ्यावर असलेल्या शहांनी सह्याद्री अतिथीगृहावर शहांची बैठक घेतली. बैठकी दरम्यान मेटे यांनीही सत्तेत वाटा मिळावा अशी मागणी केल्याची माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली. शहा यांनी सरकारचे काम कसे सुरू आहे. सरकारच्या कामकाजावर समाधानी आहात का ? लोक सरकारच्या कामावर समाधानी आहेत का ? असे प्रश्‍न विचारले. घटक पक्षांनीही शहाच्या समोर सरकारच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. मात्र आम्हाला सत्तेत वाटा केंव्हा मिळणार असा सवाल मेटे यांनी करताच आपल्याकडे लक्ष असल्याचे सांगत बोळवण केली. 

दरम्यान, पश्‍चिम महाराष्ट्रात धनगर समजाबरोबर लिंगायत समाजही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याचाही आपल्याला आगामी निवडणूकीत फायदा होऊ शकतो अशी भूमिका विनय कोरे यांनी मांडली. मात्र त्याला शहा यांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे सुत्रांनी सांगितले. 

संबंधित लेख