Amit Shah Calls urgent meeting over Maratha Reservation | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक

सिद्धेश्वर डुकरे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह महाराष्ट्रातील मराठा खासदारांची तातडीची बैठक बोलवल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत राज्य प्रभारी सरोज पांडे देखील उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण पेटलेले असताना आता महाराष्ट्र निघणाऱ्या या ठोक मोर्चाची दखल दिल्लीत देखील घेतल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह महाराष्ट्रातील मराठा खासदारांची तातडीची बैठक बोलवल्याची माहिती मिळत आहे. या बैठकित राज्य प्रभारी सरोज पांडे देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान यावेळी मराठा आरक्षणासोबत धनगर आणि मुस्लिम आरक्षणाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार
राज्य मागास आयोग स्वायत्त आहे त्यामुळे सरकार त्यामुळे सरकार कोणताही दबाव टाकू शकत नाही मात्र मराठा आरक्षणाबाबतची कायदेशीर प्रक्रिया ही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले होते. तसेच आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगा भरतीला स्थगिती देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. याच बरोबर मराठा आरक्षणासोबत  धनगर समाजाच्या आरक्षणावर देखील राज्य सरकारने टीआयएसएसला अभ्यास करायला सांगितल्याचे त्यांनी सांगितले होते.  

दिल्लीतही जंतरमंतरवर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणासाठी विविध ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाची आंदोलन सुरु असताना आणि फडणवीस सरकार समाजाच्या मागण्या मान्य करत नाही म्हणून आता मराठा क्रांती मोर्चाने दिल्लीकडे कूच केली असून, जंतर मंतरवर अनेक मराठा संघटना महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत, असे सांगितले जाते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख