amit shah | Sarkarnama

कॉंग्रेसमध्ये नव्हे तर भाजपत अंतर्गत लोकशाही : अमित शहा

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

जम्मू : "" माझ्यानंतर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कोण असेल हे कोणी मला सागू शकतो ? नाही सांगू शकत. परंतु सोनिया गांधी यांच्यानंतर कॉंग्रेसचा अध्यक्ष कोण बनू शकेल याचे उत्तर कोणीही देऊ शकते ? अशी टीका कॉंग्रेसच्या घराणेशाहीवर करतानाच देशात भाजपच असा पक्ष आहे की तेथे अंतर्गत लोकशाही नांदते आहे असे प्रतिपादन भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी येथे केले. 

जम्मू : "" माझ्यानंतर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कोण असेल हे कोणी मला सागू शकतो ? नाही सांगू शकत. परंतु सोनिया गांधी यांच्यानंतर कॉंग्रेसचा अध्यक्ष कोण बनू शकेल याचे उत्तर कोणीही देऊ शकते ? अशी टीका कॉंग्रेसच्या घराणेशाहीवर करतानाच देशात भाजपच असा पक्ष आहे की तेथे अंतर्गत लोकशाही नांदते आहे असे प्रतिपादन भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी येथे केले. 

आपल्या 95 दिवसाच्या देशव्यापी दौऱ्यास शहा यांनी काल (शनिवारी) जम्मू आणि काश्‍मीर राज्यातून सुरवात केली. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी कॉंग्रेसवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले,"" स्वातंत्र्यापूर्वी लोक चळवळ म्हणून कॉंग्रेसची स्थापना झाली असली तरी कॉंग्रेस जो आदर्श सांगत आहे तो निरुपयोगी आहे. या पक्षाने एका कुटुंबाचेच हित पाहिले मात्र देशाच्या हितासाठी या पक्षाने काहीही केले नाही. मी 1982 मध्ये जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा मी एक साधा कार्यकर्ता होतो. मला कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नव्हती. माझे कोणीही नातेवाईक राजकारणात नव्हते. जेव्हा भाजपत आलो त्यावेळी बूथचा अध्यक्ष होतो. आज भाजपचा अध्यक्ष आहे. जे माझ्याबाबत म्हणता येईल तेच अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी आणि नरेंद्र मोदी यांच्याविषयी म्हणता येईल. या तिघांनाही राजकीय पार्श्‍वभूमी नव्हती. तरीही ते मोठ्या पदावर पोचले. भाजपमध्ये अंतर्गत लोकशाही नांदत असल्याने पक्षातील एक सामान्य कार्यकर्ता केव्हाही सर्वोच्चपदापर्यंत पोचू शकतो. तसे कॉंग्रेसमध्ये होत नाही. सोनिया गांधी जर पक्षाध्यक्षपदावरून पायउतार झाल्या तर राहुल गांधी अध्यक्ष होतील. पक्षातील दुसरा कोणताही नेता अध्यक्ष होऊ शकतो का ? हाच तर भाजप आणि कॉंग्रेसमध्ये फरक आहे. '' 
.......... 
शहा उवाच 
- देशात आज 1650 राजकीय पक्ष आहेत त्यापैकी भाजप आणि माकप या दोन पक्षातच अंतर्गत लोकशाही आहे. उर्वरित सर्व पक्षामध्ये घराणेशाही आहे त्याला समाजवादी पक्षही अपवाद नाही. 
- स्वातंत्र्यापूर्वीही देशात हिंदुत्ववादी, समाजवादी, कम्युनिस्ट, मुस्लिम आदी विविध विचारसरणीचे लोक होते त्यांचा सर्वांचा हेतू देशाचे स्वातंत्र्य हेच होते. 
- कॉंग्रेसने केवळ एका कुटुंबाकडे सत्ता दिली. देशापेक्षा या कुटुंबाने स्वत:चेच हित पाहिले. 
- भाजप हा एकमेव असा पक्ष आहे की तो लोकशाहीची मूल्ये जपत आहे. 

संबंधित लेख