अमित शहांचे "मिशन 2019'

अमित शहांचे "मिशन 2019'

जम्मू : सन 2019ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आजपासून आपल्या देशाच्या दौऱ्याला सुरवात केली. या दौरा 95 दिवसाचा असणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जम्मू आणि काश्‍मीरमधून दौऱ्याला सुरवात केली असून राज्यातील पक्ष कार्यकतर्यंनी ते संवाद साधणार आहेत. 

तळागाळातील भाजप कार्यकर्त्यांपर्यंत पक्ष पोचणार आहे. निवडणूक दोन वर्षांवर येऊन ठेपली असली तरी आतापासूनच वातावरण ढवळून काढण्याचा विचार पक्षाने केला आहे. पक्षाचा विजयाचा रथ खेचून आणण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये असते याची जाणीव असल्याने शहा हे संपूर्ण देश पालथा घालणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील तयारीकडे लक्ष देण्यासाठी पक्षाकडून विशेष टीमची नियुक्ती केली जाणार आहे. या टीममध्ये एका पूर्णवेळ कार्यकर्त्यासह निरीक्षकांचा समावेश असेल. शहा स्वत: प्रत्येक राज्यात भेट देऊन तेथील बूथ स्तरावरच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. 

भाजपच्या दीनदयाळ विस्तार योजनेतंर्गत कार्यकर्त्यांच्या नियुक्‍त्याही करण्यात आल्या आहेत. या अभियानाचा भाग म्हणून शहा यांच्या जम्मू-काश्‍मीरच्या दोन दिवसीय दौऱ्याची सुरवात झाली आहे. यानंतर ते आणखी चार राज्यांना भेटी देणार आहेत. 
नियुक्त केलेले भाजपचे हे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडेपर्यंत आपापल्या मतदारसंघात कार्यरत असतील. 

शहा स्वत: या सगळ्यावर नजर ठेवणार आहेत. तर गुजरात, ओडिशा, तेलंगणा, लक्षद्वीप आणि पश्‍चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये तर ते बूथ स्तरावरील निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन करतील. या सगळ्या तयारीची पाहणी करण्यासाठी त्यांनी या दौऱ्याची आखणी केली आहे. या दौऱ्यात अमित शहा लोकसभा क्षेत्रांसाठी विशेष रणनीती आखणार आहेत. याशिवाय, ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे, मात्र प्रयत्न केल्यास पक्षाला त्याठिकाणी यश मिळू शकते, अशा लोकसभा क्षेत्रांचीही यादी शहा यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात येई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com