amit raj thakrey meets cm | Sarkarnama

अमित राज ठाकरे झाले सक्रिय! गणेश मंडळांसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित हे आता राजकीयदृष्ट्या सक्रिय होऊ लागले आहेत. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसमोर सध्या मंडप उभारण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या मंडळांचे हे गाऱ्हाणे घेऊन अमित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांना आज भेटले. 

खेतवाडीच्या गणेश उत्सव मंडळांसोबत मनसेचे शिष्टमंडळ या वेळी उपसअथित होते. या शिष्टमंडळाला भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मी स्वतः लक्ष घालतो तसेच उत्सव जसा साजरा होतो तसाच साजरा होईल अशा पद्धतीने मंडळांना सांगितले.

अमित यांच्या उपस्थितीची दखल मनसैनिकांनी गेतली.  अमितसाहेबांची शिष्टाई आणि मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनामुळे संपूर्ण खेतवाडीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले व प्रचंड जल्लोष करण्यात आला, अशा प्रतिक्रिया सोशल मिडियात व्हायरल झाल्या. अमित हे आतापर्यंत कुठे क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन कर, फुटबाॅल स्पर्धेत जा, अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावत होते. एखाद्या सार्वजनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या विषयात त्यांनी लक्ष घातले नव्हते.
 
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या मंडपाचा आकारा हे भविष्यात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. यावरून शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले आहेत. गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी दोन्ही पक्षांनी निर्णय घेतला असला तरी यात सध्या मनसेने आघाडी घेतली आहे. राज ठाकरे यांनी हिंदूंच्या सणावर निर्बंध का, असा सवाल करत तोफ डागली होती.

संबंधित लेख