मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांना अमित देशमुखांचा दणका

मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांना अमित देशमुखांचा दणका

लातूर : मुख्यमंत्र्याचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याआधीच दणका बसला आहे. लातूर येथील संत शिरोमणी मारोती महाराज सहकारी साखर कारखाना (बेलकुंड) या कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला. काॅंग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची भाजपच्या विरोधात एकत्रित मोट बांधली होती. त्याचा फटका पवार यांना बसला.


या कारखान्याच्या सोळा पैकी सोळाही जागांवर देशमुख यांच्या पॅनेलने विजय मिळवला. या कारखान्यावर शिवसेनेची याआधी सत्ता होती.मात्र येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी युती झाली ती देखील भाजपाच्या विरोधात. लातूर जिल्हाचे राजकारण यामुळे ढवळून निघणार आहे. 

भाजपाविरोधात सर्वच पक्षाची आघाडी असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी  पॅनेलच्या या विजयामुळे पवार यांचा हिरमोड झाला आहे. पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघाचे संभ्याव उमेदवारी मिळणार असल्याचे वातावरण निर्मिती करत साखर कारखान्याची सत्ता स्वताःकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी चांगली ताकद लावली होती. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचे त्यांनी सहकार्य घेतले होते. 

या निवडणुकीत भाजपातील अंतर्गत सत्तासंघर्ष आणि विरोधकांची झालेली एकी याचा परिणाम निकालात दिसून आला आहे. येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटत राहणार असल्याने साहजिकच तो चर्चेचा विषय झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com