Ambedkari Movement under police scanner? | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

आंबेडकरी चळवळीवर पोलिसांची नजर? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 मार्च 2017

आंबेडकरी चळवळीमध्ये नक्षलवादी समर्थक असल्याच्या संशयाने पोलिसांकडून आता आंबेडकरी चळवळीच्या कार्यक्रमांवर नजर ठेवली जात आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरात आंबेडकरी साहित्य संमेलन पार पडले. यात पोलिसांची संख्या लक्षणीय होती तसेच पुस्तकांच्या स्टॉलवरील काही पुस्तकेही पोलिस घेऊन गेले. 

नागपूर : आंबेडकरी चळवळीमध्ये नक्षलवादी समर्थक असल्याच्या संशयाने पोलिसांकडून आता आंबेडकरी चळवळीच्या कार्यक्रमांवर नजर ठेवली जात आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरात आंबेडकरी साहित्य संमेलन पार पडले. यात पोलिसांची संख्या लक्षणीय होती तसेच पुस्तकांच्या स्टॉलवरील काही पुस्तकेही पोलिस घेऊन गेले. 

आंबेडकरी चळवळीच्या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलिसांची उपस्थिती हा चर्चेचा विषय झाला. काही दिवसापूर्वी भाकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे व्याख्यान विद्यापीठाने रद्द केल्यानंतर दीक्षाभूमी परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने त्यांचे भाषण आयोजित केले. यावरून आंबेडकरी चळवळीचा व त्यातील विचारवंतांचा कल डाव्या विचारांकडे असल्याचे स्पष्ट होत आहे. 

पोलिसांनी या चळवळीच्या कार्यक्रमांना आता लक्ष्य केले आहे. नागपुरात पार पडलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनात पोलिसांच्या अनेक गाड्या भरून पोलिस आले होते. नक्षलवादाचे समर्थक असलेल्यांची यादी नक्षल प्रतिबंधक सेलने (एएनसी) तयार केली आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक मान्यवरांची नावे यादीत आहेत. यात राजकीय नेते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, वक्ते, विचारवंत, वकील, पत्रकार, कामगार नेत्यांचा समावेश आहे. या व्यक्ती या कार्यक्रमांना हजेरी लावतात काय? याकडे पोलिसांचे नजर असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. नक्षलवादाचे समर्थन करणारे अनेक साहित्य आंबेडकरी चळवळीच्या कार्यक्रमातून विकले जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

संबंधित लेख