Ambedkar -Owaissi is B team of BJP | Sarkarnama

आंबेडकर-ओवेसी ही भाजपची 'बी' टीम : संजय  राऊत

सरकारनामा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

या युतीचा थेट फायदा भाजपला व्हावा असा तर हेतू नाही ना? - राऊत 

मुंबई  : "मराठवाड्यात ज्या निजामाने रझाकारी अत्याचार केले त्या निजामाच्या पक्षासोबत प्रकाश आंबेडकर यांनी युती करणे हे अनाकलनीय असून, ही युती म्हणजे भाजपची 'बी' टीम असल्याचा संशय आहे," अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर व ;एमआयएम'चे असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमध्ये नुकताच दलित- मुस्लिमांचा मेळावा घेत आगामी निवडणुकीसाठी बहुजन वंचित आघाडीची स्थापना केली आहे.   या युतीचा थेट फायदा भाजपला व्हावा असा तर हेतू नाही ना, ही शंका असल्याचे राऊत म्हणाले.

" कॉंग्रेसचा पराभव करण्यासाठीच भाजपच्या पुढाकाराने या युतीचा जन्म झाल्याचा संशय असून, कट्‌टर जातीयवादावर आधारित पक्षासोबत प्रकाश आंबेडकर गेले कसे याचे आश्‍चर्य वाटते.   प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांच्या युतीच्या सभा कितीही मोठ्या झाल्या तरी जनता मते देणार नाहीत", असा दावाही राऊत यांनी केला.

संबंधित लेख