आंबेडकर ओवैसींच्या सभेचा काँग्रेस भाजपाने घेतला धसका; विरोधी पक्षाकडून सभेला सुरुंग लावण्याच्या हालचाली

वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर व अॅड ओवैसी यांच्या शुक्रवारी ता. ५ रोजी बाळापुरात होणाऱ्या जाहीर सभेचा भाजप व काँग्रेसने चांगलाच धसका घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस - भाजप कार्यकर्ते व पक्षाच्या समर्थकांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावत रखरखत्या उन्हातही बाळापूर शहरात आपला पाया मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
आंबेडकर ओवैसींच्या सभेचा काँग्रेस भाजपाने घेतला धसका;  विरोधी पक्षाकडून सभेला सुरुंग लावण्याच्या हालचाली

बाळापूर (अकोला) : वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर व अॅड ओवैसी यांच्या शुक्रवारी ता. ५ रोजी बाळापुरात होणाऱ्या जाहीर सभेचा भाजप व काँग्रेसने चांगलाच धसका घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस - भाजप कार्यकर्ते व पक्षाच्या समर्थकांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावत रखरखत्या उन्हातही बाळापूर शहरात आपला पाया मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-सेना या प्रमुख पक्षाला विरोध करून भारिप-बहुजन महासंघ व एमआईएम आणि इतर घटक पक्षांनी वंचित आघाडीची मोट बांधली आहे. शुक्रवार ता. ५ एप्रिल रोजी शहरातील काॅटन मार्केट परीसरात ॲड. आंबेडकर व खा. ओवैसी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेला बारा बलुतेदार समाजातील असंख्य नागरीकांसह अल्पसंख्याक समाजातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

बाळापूर शहरात बौद्ध व मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील बौद्ध समाज भारीप बहुजन महासंघाची व्होटबँक असून लोकसभा निवडणुकीत गतवेळी अॅड. आंबेडकर हे संजय धोत्रेंच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे येथे खा. ओवैसी व आंबेडकर यांच्या जाहीर सभेचा  परिणाम मुस्लिम समाजावर होणार तर नाही ना.? याची धास्ती काँग्रेस व विशेषतः भाजप-सेनेला आहे.

तर ऐनोद्दीन खतीब यांच्या राजधानीत काँग्रेस फ्लॉप ठरली, असा ठपका बसू नये म्हणून आंबेडकर व ओवैसी यांच्या जाहीर सभेला जास्त गर्दी जमू नये यासाठी सुरुंग लावण्याच्या हालचालीही काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडून सुरू असल्याची चर्चाही रंगत आहे. अॅड. आंबेडकर व ओवैसी यांच्या जाहीर सभेचा अल्पसंख्याक समाजावर काय प्रभाव पडतो याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com