ambedkar and mim | Sarkarnama

आघाडी आमच्यासोबत की एमआयएमसोबत ! - आंबेडकरांचा कॉंग्रेसला सवाल

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला आघाडी आमच्यासोबत करावयाची आहे की, एमआयएमसोबत, असा प्रश्‍न वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कॉंग्रेस आघाडीसोबत लोकसभा निवडणुकीतील चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. ही चर्चा केवळ माध्यमांमधून सुरू आहे. कॉंग्रेसने 12 जागा सोडल्याचे आता माध्यमांमधूनच जाहीर करावे, त्यांचा प्रस्ताव आम्ही स्वीकारल्याचे माध्यमांमधूनच जाहीर करू, असे आंबेडकर यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 

कॉंग्रेस आघाडीकडे 12 जागांवर उमेदवार नाही. त्यांना तिथे तीन-चार वेळा निवडणूक जिंकता आली नाही. या जागा त्यांनी वंचित आघाडीसाठी सोडाव्यात. त्यामुळे आम्ही केलेली ही मागणी अवास्तव असल्याचा प्रश्‍नच नाही. शेवटी निर्णय त्यांना घ्यावयाचा आहे. वंचित आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करून निर्णय कळविणार असल्याचे सांगितले. त्यांचा निर्णय अद्याप कळविला नाही. आघाडीसाठी पर्याय शेवटपर्यंत उघडे आहेत. देश वाचविण्यासाठी आघाडी होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे आंबेडकर म्हणाले. 

कॉंग्रेसने एमआयएमबाबत घेतलेल्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले की, कॉंग्रेसला आघाडी आमच्यासोबत करावयाची आहे की, एमआयएमसोबत. आम्ही एमआयएमसोबत आघाडी केली आहे. आमचे आम्ही बघून घेवून. कॉंग्रेसने एमआयएमसोबत समझोता करण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे सांगून त्यांनी आघाडीत एमआयएमची अडचण येण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचे सांगितले. 
कॉंग्रेसचा निर्णय आधीच झाला... 
अकोला लोकसभा मतदारसंघातील आघाडीबाबत बोलताना आंबेडकर यांनी कॉंग्रेसचा निर्णय आधीच झाला असल्याचे सांगून, त्यांचा उमेदवारही निश्‍चित असल्याचे स्पष्ट केले. अल्पसंख्याक समाजातील एक तरूण चेहरा कॉंग्रेस या मतदारसंघात देणार असल्याचे संकेतही आंबेडकर यांनी चर्चा करताना दिले. 
 
संबंधित लेख