ambedakar slams ncp | Sarkarnama

राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये सनातन्यांची घुसखोरी : प्रकाश आंबेडकर

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पंढरपूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये सनातन्यांची घुसघोरी झाली आहे. भीमा कोरेगाव दंगलीमध्ये सनातन्यांचा हात असल्याचे समोर आले आहे, असा आरोप भारीप बहुजन वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

संभाजी भिडे यांना वाचविण्यात कोण पुढे आहेत, हे आम्ही दाखवून दिलेले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी आम्हाला युतीचा हात पुढे करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीतील आघाडीत भारीपच्या समावेशाबाबत बोलताना ते म्हणाले की या दोन्ही पक्षांनी लोकसभेच्या सर्व जागा लढवाव्यात आमचे काहीच म्हणणे नाही. त्यामुळे काॅंग्रेसवर अवलंबून राहण्याचा प्रश्नही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काॅंग्रेस आता आम्हाला युतीसाठी हात पुढे करत आहे. मात्र आम्ही जेव्हा काॅंग्रेसकडे आघाडीचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. एमआयएम सोबत आमची  युती आहे. त्यामुळे काॅगेसवर अंवलंबून राहण्याचा प्रश्नच येत नाही. काॅंग्रेसच्या प्रस्तावावर आमच्या बैठकीत विचार करू. एमआयएमचा हात पकडल्यानंतर  आता काॅगेसचे  डोळे उघडले आहेत, असाही टोला त्यांनी लगावला. 

संबंधित लेख