ambadas danve warned dhanjay jadhav | Sarkarnama

उद्धव ठाकरेंविषयी वेडवाकड बोलू नका, अंबादास दानवेंचा हर्षवर्धन जाधवांना इशारा 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

औरंगाबाद ः उद्धव ठाकरेंनी मला भेट नाकारली, मराठा आरक्षणावर बोलू नये म्हणून मंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला असे बिनबुडाचे आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी करू नयेत. त्यांना जे काही वैयक्तिक काय बोलायचे असेल ते बोलावे, पण शिवसेना नेतृत्वा विषयी वेडवाकड बोलू नका असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी "सरकारनामाशी' बोलतांना दिला. 

उद्धव ठाकरे आणि मंत्री शिंदे यांच्या सदंर्भात कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी (ता. 31) मुंबई व औरंगाबाद येथे काही विधाने केली होती. या सदंर्भात दानवे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करतांनाच जाधव यांचे आरोप खोडसाळपणाचे असल्याचे म्हटले आहे. 

दानवे म्हणाले,"" मुंबईत उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदारांची बैठक दुपारी साडेबारा वाजता बोलावली होती. पण जाधव यांनी दहा वाजताच भेटण्याचा आग्रह धरला, तेव्हा काय बोलायचे ते बैठकीत बोलू असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर पक्षाच्या बैठकीला हजर न राहता जाधव यांनी उद्धव ठाकरेंनी मला भेट दिली नाही असे सांगणे चुकीचे आहे.'' 

दुसरा आरोप जाधव यांनी असा केला की, एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरून मला "मराठा आरक्षणावर तुम्ही बोलायचे नाही' असा फोन आल्याचा, तर त्यातही तथ्य नाही. उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर सर्व शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. तिथे पक्षाने मराठा आरक्षणा विषयची आपली भूमिका स्पष्ट केली होती. 

त्यामुळे पक्ष नेतृत्वाने एखाद्या विषयावर भूमिका मांडली असेल तर त्यावर पुन्हा स्वतंत्रपणे बोलणे संयुक्तिक नाहीच. सर्वच आमदारांना हा नियम लागू होतो, पण याही बाबतीत हर्षवर्धन जाधव यांनी चुकीचे आरोप केले जे योग्य नाही असेही दानवे म्हणाले. 

संबंधित लेख